प्रेमवारीतील हळदी सॉंग 'पूजाच्या हळदीलाच' रिलीज (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

प्रेमवारी" या चित्रपटाचे  'पूजाच्या हळदीला' हे सॉंग रिलीज झाले. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत.

मुंबई- "प्रेमवारी" या चित्रपटाचे  'पूजाच्या हळदीला' हे सॉंग रिलीज झाले. लग्नाच्या आधी हळदीच्या कार्यक्रमातील हे गाणं एक पार्टी सॉंग आहे. भारत गणेशपुरे आणि अभिजित चव्हाण या गाण्यात नाचताना दिसत आहेत.

या गाण्याचे चित्रीकरण शिर्डी जवळच्या वारी गावात, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते राजेंद्र गायकवाड यांच्या घरी करण्यात आले आहे. हे गाणं चित्रित करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये लग्नघर दिसावे म्हणून अनेक बदल करण्यात आले होते. हे गाणं अमितराज आणि आदर्श शिंदे यांनी गायले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला संगीत दिले असून, मंदार चोळकर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले आहे. 'प्रेमवारी' चित्रपट ८ फेब्रुवारी ला  प्रदर्शित होत आहे.  

दरम्यान, प्रेमवारी या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे. या सिनेमाचे  लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: In Premvari Movie Haldi Song releases On Pooja Haldi program