Priya Bapat: 'कोणत्याच मराठी अभिनेत्रीत हिम्मत नाही जी..', प्रियाचा व्हिडीओ अन् चाहत्याची भन्नाट कमेंट व्हायरल..

प्रिया बापटनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत एक पाऊल पुढे जात हटके फोटोशूट केलेलं दिसत आहे.
Priya Bapat Video
Priya Bapat VideoEsakal
Updated on

Priya Bapat Video: मराठीतील फिटनेस फ्रीक अभिनेत्री म्हटलं की पहिलं नाव येतं ते प्रिया बापटचं. प्रिया बापट सिनेमे वेळ घेत करत असली तरी व्यायामाच्या बाबतीत मात्र तिचं सातत्य दिसून येतं.

प्रिया बापट सोशल मीडियावरही आपले एक्सरसाईजचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच शेअर केलेला तिचा व्हिडीओ आहे ज्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

प्रियाचे चाहते तिचा हॉट आणि सिझलिंग अवतार पाहून पुरते लट्टू झाले आहेत. बरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिया बापटच्या व्हिडीओसोबतच त्यावरील चाहत्यांच्या कमेंट्सनी सर्वात अधिक लक्ष वेधलं आहे.

Priya Bapat Video
Nora Fatehi Video: कुणी म्हणालं मच्छर तर कुणी...,एअरपोर्टवरील नोरा फतेहीचा लूक पाहून नेटकऱ्यांंच्या भन्नाट कमेंट्स

प्रिया बापटचे सिनेमे फार वेळानं प्रेक्षकांच्या भेटीस येत असले तरी सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ, फोटो मात्र प्रेक्षकांसाठी स्पेशल ट्रीट असतात. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओत प्रियाचा आऊटफिटच नाही तर तिचा अॅटिट्युडही लोकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

प्रियाचा हा हॉट अवतार तसा पहिल्यांदाच पहायला मिळतोय. सुंदर तर ती दिसतेच आहे पण तिनं फोटोसाठी दिलेल्या बोल्ड पोझेस थेट लोकांच्या काळजात घर करतायत.

हेही वाचा: महिलांनो तरुणपणी घेतलेली जमीन उतारवयात होईल आधार

प्रिया बापटच्या या व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्सही पहायला मिळत आहेत. अनेकजणांना तिचा हा हॉट अंदाज आवडला आहे..तर तिच्या एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं आहे,''मराठी इंड्ट्रीतील stylish & fitness icon जर कोणी असेल तर तू आहेस . आत्मविश्वास काय असतो हे तू दाखवून देतेस. माझी बायको प्रज्ञा तुझी खूप मोठी fan ahe . तिला रिप्लाय नक्की दे.'' तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'तुला मात देईल अशी कोणच नाही आणि कोणत्या इतर मराठी अभिनेत्रीत ती हिम्मतच नाही..'

असं म्हणत चाहत्यानं एकप्रकारे इतर अभिनेत्रींना आव्हानंच दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com