Priya Bapat: आईनं माझा बोल्ड सीन पाहिल्यावर सांगितलं, 'तू आता...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actress priya bapat participate in bus bai bus

Priya Bapat: आईनं माझा बोल्ड सीन पाहिल्यावर सांगितलं, 'तू आता...'

City Of Dreams Marathi Actress Priya Bapat: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमीच तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. मराठी, हिंदी, सारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तिनं महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रियानं केलेली सिटी ऑफ ड्रीम्स नावाची वेबसीरिज ही चाहत्यांना कमालीची आवडली. चाहत्यांनी त्यावरुन तिच्यावर कौतूकाचा वर्षावही केल्याचे दिसून आले. या मालिकेचे दोन सीझन व्हायरल झाले होते.

प्रिया ही सध्या बस बाई बस मालिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्या कार्यक्रमाचे होस्टिंग करणाऱ्या सुबोध भावेनं तिला विचारलेल्या प्रश्नामुळे प्रिया अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसलत आहे. प्रियानं यावेळी सुबोधच्या प्रश्नांना सडेतोडपणे उत्तरं दिली आहेत. त्यावर तिच्या चाहत्यांनी देखील तिचं कौतूक केल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स नावाची मालिका प्रदर्शित झाली होती. त्यात प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर यांच्या भूमिका होत्या.

प्रियानं यात केलेली महिला मुख्यमंत्र्यांची भूमिका ही लोकप्रिय झाली होती. त्यामुळे प्रिया ही नजरेतही आली होती. प्रिया ही सुबोध भावेच्या बस बाई बस या शोमध्ये आली होती. त्यामध्ये एका महिलेनं प्रियाला तिच्या सिटी ऑफ ड्रीम्स मालिकेवरु काही प्रश्न विचारले. त्यात पहिला प्रश्न होता तो असा की, त्या मालिकेतील बोल्ड सीन्स पाहिल्यावर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती.

प्रिया म्हणाली, मुळात मी एका मध्यमवर्गीय कुटूंबातून आली आहे. त्यामुळे एक गोष्ट साहजिक आहे ती म्हणजे जेव्हा अशी एखादी भूमिका करण्याची वेळ येते तेव्हा मोठं दडपण कलाकाराच्या मनावर असते. माझ्या बाबतही असेच झाले. घरच्यांकडे स्मार्ट फोन नसल्यानं त्यांना त्या मालिकेविषयी आणि त्यातील बोल्ड दृश्यांविषयी माहिती नव्हतं. पण तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याविषयी सांगितले होते.

हेही वाचा: PS 1 Review: पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण निव्वळ 'रटाळवाणा'

माझी तुम्हाला लाज तर वाटत नाही ना? असं मी घरच्यांना विचारलं होतं. त्यावर बाबा म्हणाले की, तू आता एक अभिनेत्री आहे. तू काय करते हे प्रत्येकवेळी सांगायला हवं असंही नाही. अशी प्रतिक्रिया वडिलांनी दिली. तर आईनं चूक झाली पुन्हा नाही करायची असं म्हटलं होतं. प्रियानं दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

हेही वाचा: Movie Review: 'फनरल'- 'आनंदी जीवनाचा जगण्याचा नवा मंत्र'