समोर ९०० लोकं आणि आम्ही २ तास लेट, हास्यजत्रेच्या कलाकारांचा अमेरिकेतला त्रासदायक अनुभव Maharashtrachi Hasyajatra

प्रियदर्शनीने त्यांचा अनुभव सोशल मिडीयावर शेअर केलाय
priyadarshini indalkar share horrible experience of maharashtrachi hasyajatra us tour show
priyadarshini indalkar share horrible experience of maharashtrachi hasyajatra us tour show SAKAL
Updated on

Maharashtrachi Hasyajatra US Tour News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो प्रेक्षकांचा अत्यंत लाडका शो. सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो बंद आहे. पण प्रेक्षक मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा शोला मिस करत आहेत.

सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे कलाकार अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधील कलाकारांनी खळखळुन हसवलं.

पण प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी या कलाकारांना खुप कसरत करावी लागली. प्रियदर्शनीने त्यांचा अनुभव सोशल मिडीयावर शेअर केलाय

(priyadarshini indalkar share horrible experience of maharashtrachi hasyajatra us tour show )

priyadarshini indalkar share horrible experience of maharashtrachi hasyajatra us tour show
Shah Rukh Khan: मी बॅंक अकाऊन्ट उघडू शकत नाही, अॅसीड हल्ला पीडीतेची शाहरुखकडे मदतीची हाक

प्रियदर्शनीने त्यांचा अमेरिकेतल्या धावपळीचा व्हिडीओ शेअर केलाय. प्रियदर्शनी लिहीते.. आमची flight cancel झाली. ४ वाजता न्यू जर्सी ला शो होता आणि आम्ही २ वाजेपर्यंत अजून बॉस्टन ला च होतो. हे समजल्यावर लगेच बॉस्टन च्या महाराष्ट्र मंडळाचे लोक airport वर पोचले. आमच्यासाठी by road जाण्याची व्यवस्था करण्यात आली. NJ च्या लोकांना mail पोहोचली की ४ चा शो ७ वाजता सुरु होईल कारण असं असं झालय.

प्रियदर्शनी पुढे लिहीते.. रस्त्यात जेवणासाठी १६ min थाबुंन आम्ही full स्पीड ने ५ तासांच्या drive साठी निघालो. नेमका traffic ने आम्हाला त्रास दिला.

गेल्या गेल्या शो सुरु करता यावा म्हणुन आम्ही गाडीतच मेक अप केला. केस आवरले. प्रेक्षकाना zoom call करुन विनंती केली की अजून काही काळ please कळ सोसा, आम्ही पोहोचतच आहोत.

priyadarshini indalkar share horrible experience of maharashtrachi hasyajatra us tour show
Lapataganj Arvind Kumar: 'लापतागंज'मधील लोकप्रिय अभिनेत्याचं निधन; शुटसाठी जात असतानाच...

प्रियदर्शनीने शेवटी लिहीलं.. त्या दिवशी हास्यजत्रेची पुण्याई कळाली. जवळपास ९०० लोक, sold out show, २ तास आमची वाट पाहत होते आणि टाळ्यांच्या गजरात आमचं स्वागत झालं. खूप लांबून लोक आले होते आणि सगळे थांबले होते.

हास्यजत्रेवरचं हे प्रेम पाहुन आम्ही सगळे भारावुन गेलो होतो. आमच्या संपूर्ण टीम ची आठवण काढली. मी नशिबवान आहे की या teamचा भाग आहे. USA Tour मधल्या NJ च्या शो साठी केलेली धावपळ आणि त्यावरचा प्रतिसाद हा कायम आठवणीत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com