प्रियांका आणि कतरिना ‘क्रिश 4’ मध्ये?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

क्रिशचे पुढचे दोन्ही भाग ‘बाहुबली’सारखे करायचे, असे राकेश रोशन यांनी ठरवल्यानंतर ‘क्रिश 4’ आणि ‘क्रिश 5’ हे दोन्ही भाग एका वर्षाच्या अंतराने प्रदर्शित करायचे असे ठरवले गेले. त्यासाठी या दोन्ही चित्रपटांची पटकथा राकेश रोशन लिहून पूर्ण करत आहेत. यामध्ये हृतिक रोशनबरोबर एका अभिनेत्रीला घ्यायचे ठरवले होते. पण आता या चित्रपटात दोन अभिनेत्रींचा समावेश होणार आहे.

प्रियांका चोप्रा या क्रिश चित्रपटश्रृंखलेचा एक महत्त्वाचा हिस्सा आहे. त्यामुळे तिची जागा आणखी कोणी घेऊच शकत नाही. त्यामुळे हृतिकने प्रियांकाशी कशीतरी समजूत घातली आहे आणि आता प्रियांकाही क्रिश करण्यासाठी तयार झाली आहे म्हणे. तर दुसऱ्या हिरोईनच्या यादीत कतरिनाच्या नावाची चर्चा आहे. हृतिक आणि कतरिनाची जोडी आपण ‘बॅंग बॅंग’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटातून पाहिली होती. दोघांची केमिस्ट्रीही चांगली जुळून आली होती. त्यामुळे दुसऱ्या हिरोईनसाठी कतरिनाच्या नावाची चर्चा आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka and katrina together in krish 4

टॅग्स