प्रियांका पुस्तकरूपात 

भक्ती परब  
गुरुवार, 6 जुलै 2017

काय रे रास्कला या सिनेमाच्या पत्रकार परिषदेत प्रियांका चोप्रावर सिनेमा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्‍नाला उत्तर देताना प्रियांकाच्या आई मधु चोप्रा म्हणाल्या की,"सिनेमाचं मी काही सांगू शकत नाही.

पण तिच्यावर पुस्तक तर लिहिलं गेलंच पाहिजे. प्रियांका चोप्राची अभिनय क्षेत्रातील कामगिरी तरुणाईला प्रेरणादायी ठरेल अशीच आहे. प्रियांकाने बॉलीवूड, हॉलीवूड तसंच निर्माती बनून प्रादेशिक सिनेमांमध्येही पाऊल टाकलं आहे. तिला मिळालेलं हे यश, तिने केलेली ही प्रगती नक्कीच येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल.

त्यामुळे तिच्यावर पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे.'' त्या पुढे असंही म्हणाल्या की, ""आजच्या तरुणाईने तिचं बोलणं ऐकलं तरी ते त्यांच्या फायद्याचं ठरेल. अवघं जग प्रियांकाचं आज कौतुक करतंय; पण प्रियांकाला अजून मोठा पल्ला गाठायचाय. पण आतापर्यंत तिने जो टप्पा गाठलाय त्या टप्प्यावर पुस्तक लिहिलं जाऊ शकतं.

तिचा प्रवास तुम्हाला मोटीवेट करू शकतो; पण आतापर्यंतचा तिचा प्रवास इंटरेस्टिंग नाहीय. त्यामुळे सिनेमाच्या कथेसाठी लागणारा इंटरेस्टिंग स्टफ अजून तिच्या आयुष्यात यायचाय. प्रॉडक्‍शन हाऊसच्या कामात प्रियांका जातीने लक्ष घालते. सिनेमांसाठी आलेल्या कथा, पटकथा ती वाचते.

सगळे क्रिएटिव्ह डिसीजन ती घेते आणि मी प्रॉडक्‍शनची आर्थिक बाजू सांभाळते.''  प्रत्येक आईला आपल्या मुलीचा अभिमान वाटतोच आणि मधु चोप्रा तर आघाडीची अभिनेत्री प्रियांकाच्या आई आहेत. त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होवो. 

Web Title: Priyanka Books