प्रियांका चोप्राला आई व्हायचंय, पण अगाेदर करायचंय हे...

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

बॉलिवूड ते हाॅलिवूड पर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा हाेय. ती अनेक कारणांनी नेहमीच लाईमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफ बद्दल चर्चेत आहे. 

मुंबई : बॉलिवूड ते हाॅलिवूडपर्यत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. ती अनेक कारणांनी नेहमीच लाइमलाईटमध्ये असते. मागच्या काही काळापूर्वी प्रियांका तिच्या पर्सनल लाइफबद्दल चर्चेत आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट केलं होत. त्यानंतर आता यावर प्रियांका यावर बाेलली आहे. प्रियांका सांगते, निकशी लग्न केल्यानंतर माझ्या विशलिस्टमध्ये काही गोष्टी नव्यानं सामील झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई होणं ही आहे. 

प्रियांका म्हणाली, मला आई व्हायचंय मात्र त्याआधी मला माझ्या पतीसाठी एक खास गोष्ट करायची आहे. प्रियांकाला आई होण्याआधी तिच्या पतीसाठी म्हणजे निक जोनाससाठी न्यूयॉर्कमध्ये घर घ्यायचं आहे. प्रियांका सांगते मी आज अमेरिकेत जे काही आहे किंवा जे काही करते ते सर्व मी माझ्या देशात म्हणजे भारतात शिकले आहे. 

प्रियांका सांगते मी अशा ठिकाणी खूप खूश असते ज्या ठिकणी खूप माणसं आहेत. ज्यांच्यावर मी प्रेम करते तेच माझं घर आहे. पण माझ्या पतीसाठी घर खरेदी करणं आणि स्वतःचं बाळ असणं हे सध्या माझ्या लिस्टमध्ये टॉपला आहे. निक जोनासशी लग्न केल्यानंतर प्रियांका भलेही सिनेमांपासून दूर आहे. पण ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी लाइमलाइटमध्ये असते. 

दरम्यान, तु निकसोबत कधी गाण्याचा प्रयत्न करतेस का? या प्रश्नवार प्रियांका सांगते, तो एक खूप चांगला गायक आहे. मी घरात त्याच्यासोबत गाते मात्र तसा प्रयत्न करत नाही कारण निक खूपच सुंदर गातो.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka chopra expressed her dream about her pregnancy