अन् प्रियांका चोप्राला महाराष्ट्र पोलिसांनी दिली ताकीद...

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

चित्रपटातील अनेक डायलॉग सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र त्यातील एका डायलॉगवर महाराष्ट्र पोलिसांनी प्रियांका चोप्राला ताकिद देणारं एक ट्विट केलं आहे.

मुंबई : सोनाली बोस दिग्दर्शित 'दि स्काय इज पिंक' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळतेय.

जायरा वसीम म्हणजेच आएशा हिला एक गंभीर आजार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. चित्रपटातील अनेक डायलॉग सध्या चांगलेच चर्चेत आहेत. मात्र त्यातील एका डायलॉगवर महाराष्ट्र पोलिसांनी प्रियांका चोप्राला ताकिद देणारं एक ट्विट केलं आहे. तो डायलॉग असा आहे की, " एक बार आएशा ठीक हो जाए ना, फिर साथ में बॅंक लुटेंगे ". पोलिसांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, " IPC कलम 393 च्या अंतर्गत सात वर्षे तुरुंगवास होतो #ColoursOfLaw #TheSkyIsPink ". या ट्विटसोबत चित्रपटातील डायलॉगचा एक फोटोही शेअर केला आहे. खरंतर ट्रेलरच्या शेवटी मजा करत असताना प्रियांका फरहानला उद्देशून हे वाक्य म्हणते.

महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या या ट्विटवर प्रियांकानेही रिप्लाय केला आहे. ट्विट करताना तिने लिहिलं आहे की, "ओप्स रंगे हात पकडले गेले... आता वेळ आलेय प्लान B सक्रिय करण्याची ". 

या चित्रपटामध्ये प्रियांका अदिती चौधरी आणि फरहान अख्तर निरेन चौधरी या पात्राच्या भुमिकेत आहे. तर, जायरा त्यांची मुलगी आएशा म्हणून दिसणार आहे. 'दि स्काय इज पिंक' हा चित्रपट एकुण 25 देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chopra, Farhan Akhtar's Plan of Bank Robbery in The Sky Is Pink Goes Kaput as Maharashtra Police Issues Warning