निर्मिती क्षेत्रात प्रियांकाची भरारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा अभिनयानंतर आता निर्मिती क्षेत्रातही भरारी घेतेय. त्याचं कारणही तितकंच खास आहे. प्रियांका निर्मित ‘पहुना ः द लिटल व्हिजिटर’ चित्रपटाने जर्मनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये दोन पुरस्कार पटकावलेत.

युरोपियन फिल्म पुरस्कारानेही तिच्या चित्रपटाला गौरवण्यात आलंय. व्यावसायिक ज्युरी फिचर फिल्म इंटरनॅशनल कॅटेगरीमध्येही चित्रपटाला नामांकन मिळालंय. प्रियांकाच्या चित्रपटाने एक विक्रम केलाय. चित्रपटाची कथा तीन लहान नेपाळी मुलांच्या  जीवनावर आधारित आहे. त्यांच्या आई-वडिलांचा काडीमोड झालाय. अशा स्थितीत ते स्वतःला कसं सावरतात? त्यांच्या आयुष्याला कशी दिशा मिळते याचं चित्रण चित्रपटात आहे. प्रियांका आणि मधू चोप्रा यांच्या पर्पल पेबल पिक्‍चर्स बॅनरअंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन पाखी टायरवाला यांनी केलंय. ‘आम्ही चित्रपट बनवायचं ठरवलं तेव्हा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकताच होती; पण चित्रपटाला मिळत असलेल्या यशाचं मोठं समाधान आहे,’ असं मधू चोप्रा सध्या सर्वांना मोठ्या अभिमानाने सांगतात. एकंदरीत प्रियांकाला २०१८ वर्ष चांगलंच लकी ठरतंय...

Web Title: Priyanka Chopra in the field of production