
प्रियांका आणि मनीष हे दोघे चांगले मित्र होते. अनेक पार्टी, कार्यक्रमामध्ये ते एकत्र असायचे. पण, या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे की, प्रियांका आणि मनीष यांचं काहीतरी बिनसलं आहे.
मुंबई : बॉलिवूडमध्ये म्हणजेच मनोरंजन क्षेत्रात एकीकडे लव्ह अफेअरच्या चर्चा असतात. तर, दुसरीकडे काही सेलिब्रिटींमध्ये 'कोल्ड वॉर' सुरु असतो. याच कोल्ड वॉरमधून सोश मीडियावर कधी आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरु असतो. अनेकदा फंक्शनमध्ये एकमेकांना इग्नोरही केलं जातं. देसी गर्ल प्रियांका नुकतीच भारतात येऊन गेली. एका कार्यक्रमादरम्यान तिने चांगला मित्र असलेल्या मनीष मल्होत्राला इग्नोर केलं आहे.
प्रियांका तिचा पती निक जोनस सह युएसला असते. त्यामुळे मधून अधून कार्यक्रम किंवा चित्रपटाच्या शुटिंगकरता ती भारतात परत येते. दरवर्षी पार पडणाऱ्या मुंबई पोलिसांचा कार्यक्रम 'उमंग 2020' यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यामध्ये देसीगरर्ल प्रियांचा चोप्राही होती. पण, या कार्यक्रमादरम्यान एक विचित्र प्रकार घडला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच रांगेत बसलेल्या प्रियांकाने स्टेजवर जाताना सर्वांना ग्रीट केलं अर्थात अभिवादन केलं. पण, हे करत असताना प्रियांकाने थेट मनीष मल्होत्राला इग्नोर करत त्याचा अपमान केला. याचा व्हिडीओ फोटोजर्नसिल्ट विराल भयानीने शेअर केला आहे.
The way she ignored Manish lol pic.twitter.com/Ac8gGRGPq8
— Jai (@PriyankaXChris) January 22, 2020
मनीष मल्होत्रा हा प्रसिद्ध डिझायनर आहे. सर्व सेलिब्रिटींचे कपडे तो डिझाइन करतो. सर्व कलाकारांशी त्याची चांगली मैत्रीही आहे. याआधी प्रियांका आणि मनीष हे दोघे चांगले मित्र होते. अनेक पार्टी, कार्यक्रमामध्ये ते एकत्र असायचे. पण, या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे की, प्रियांका आणि मनीष यांचं काहीतरी बिनसलं आहे आणि त्यामुळेच प्रियांकाने त्याला इग्नोर केलं आहे.
प्रियांकाने पहिल्या रांगेत बसलेल्या अरबाज खान, त्याची गर्लफ्रेंड, डायना पेन्टी, शिल्पा शेट्टी, तब्बू यांची भेट घेतली. पण, त्याच रांगेत बसलेल्या मनीषकडे तिने पाहिलंही नाही. अशा प्रकारच्या तिच्या वागण्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे की, नक्की या दोघांमध्ये काय झालं आहे. प्रियांकाचा नुकताच 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट रिलिज झाला. पण, बॉक्सऑफिसवर त्याने खास काही कमाल केली नाही.