माराकेशमध्ये अवॉर्ड मिळवणारी प्रियांका चोप्रा जोनस ठरली पहिली भारतीय अभिनेत्री

Priyanka Chopra Jonas becomes the first Indian actress to win award at Marrakech Film Festival
Priyanka Chopra Jonas becomes the first Indian actress to win award at Marrakech Film Festival

मुंबई : मोरोक्को येथे सुरु असलेल्या माराकेश आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रियांका चोप्राला जोनस सिनेमातील योगदानाबद्दल दोन अवॉर्ड मिळाले आहेत. शुक्रवारी (ता.6) हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियांकाने ट्रेंडच्या यादीमध्ये प्रथम स्थान मिळविले. नुकत्याच झालेल्या युनिसेफ मध्ये प्रियांकाला 'डॅनी काये हुम्यानिटेरियन अवॉर्ड' मिळाला होता. माराकेश फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मानित होणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर प्रियांकाने कृतज्ञता व्यक्त केली. प्रियांकाने नुकतचं तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझ्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला जवळपास २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज मला हा पुरस्कार मिळाला त्याचा मला खूप अभिमान वाटतो आहे. माझ्या चाहत्यांचे आणि सर्वांचे मी मनापासून आभार मानते."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Still thinking of last night...(Also, finally have HQ pics)

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका चोप्रा जोनसशिवाय इराणी अभिनेत्री गोलशिफ्तेह फरहानी, अमेरिकन चित्रपट निर्माते-अभिनेता रॉबर्ट रेडफोर्ड, फ्रेंच अभिनेता मेरीओन कोटिल्ड, ब्रिटीश निर्माता जेरेमी थॉमस, अमेरिकन अभिनेता हार्वे कीटल, फ्रेंच दिग्दर्शक बर्ट्रॅन्ड टॅव्हर्नियर आणि इटालियन दिग्दर्शक लुका ग्वाडग्निनो ही मंडळी पुरस्कारासाठी उपस्थित होते . 
'माराकेश फिल्म फेस्टिवल' मध्ये बेस्ट फिल्म्स, फिल्ममेकर, ऍक्टरेस यांना या पुरस्काराने पुरस्कृत केले जाते.  हा पुरस्कार २००१ पासून दिला जात आहे. या वर्षीचा पुरस्कार भारतीय आणि हॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री प्रियांका चोप्राला मिळाला. या फेस्टिवल मध्ये गोल्डन स्टार आणि ग्रँड प्राईझ असे दोन पुरस्कार दिले जातात.

प्रियांका पद्मश्री पुरस्काराने सम्मानित आहे. 
प्रियांका चोप्रा जोनस शेवटी "द स्काय इज पिंक " या चित्रपटात दिसून आली होती. ती सध्या नेटफ्लिक्सच्या एका चित्रपटासाठी तयारी करत आहे. नेटफ्लिक्स च्या 'व्हाईट टायगर' मध्ये ती राजकुमार राव बरोबर झळकणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com