प्रियांका चोप्राच्या काकांसोबत घडलं असं काही की पोलिसांनी दाखल केला गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 मे 2020

नुकतीच प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्राच्या बाबतीत हैराण करणारी बातमी समोर येत आहे. मीर चोप्राने ट्वीट करत याबाबत अधित माहिती दिली आहे. 

मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास सध्या परदेशात आहे. पती निक जोनाससोबत ती तिचा वेळ घालवत आहे. मात्र नुकतीच प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्राच्या बाबतीत हैराण करणारी बातमी समोर येत आहे. मीर चोप्राने ट्वीट करत याबाबत अधित माहिती दिली आहे. 

हे ही वाचा: 'हे' करताना सनी लिओनीने घातले असे कपडे अन्..

प्रियांकाची चुलत बहीण मीरा चोप्राने सांगितलं की, तिचे वडिल जेव्हा वॉकसाठी गेले होते तेव्हा स्कुटरवरुन आलेल्या दोन गुंडांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून त्यांचा फोन हिसकावून घेतला. एवढंच नाही तर मीराने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टॅग करत विचारलंय की, यालाच सुरक्षित शहर म्हणतात का?

मीराने ट्वीट करत लिहिलंय, 'दिल्ली पोलिस माझे वडिल पोलिस कॉलनीमध्ये वॉक करत होते. तेव्हा भरधाव स्कुटरवर आलेल्या दोन गुंडांनी माझ्या वडिलांना चाकूचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडून फोन हिसकावला. अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सीपी हेच आहे का सुरक्षित शहर दिल्ली?'

मीराच्या या ट्वीटवर दिल्ली पोलिसांकडून उत्तर देखील आलंय. त्यांनी लिहिलंय, या प्रकरणावर ते लवकरंच अधिक माहिती देतील. आणि पोलिस गुंडाविरोधात कारवाई करतील.

तर दुसरीकडे मीरा चोप्राने एका चाहत्याला उत्तर देताना म्हटलंय, या घटनेनंतर माझे वडिल एकदम व्यवस्थित आहेत. आणि त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. 

मीरा चोप्रा प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे. मीराने गेल्या वर्षी फिल्म सेक्शन ३७५ मध्ये दिसून आली होती. या सिनेमातून तिच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं होतं.  

  priyanka chopras uncles phone gets snatched at knife point in delhi  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopras uncles phone gets snatched at knife point in delhi