esakal | '' 'मिस वर्ल्ड' झालीये याचा आनंदच,पण तुझ्या अभ्यासाचे काय'' ?
sakal

बोलून बातमी शोधा

 Priyankas mom ask about studies after Miss World win

प्रियंकाचा भाऊ सिध्दार्थ हा त्यावेळी 11 ते 12 वर्षांचा होता. तो म्हणाला, माझ्या मनात त्यावेळी संमिश्र भावना होत्या. माझी बहिण जिंकली याचा मला आनंदच होता.

'' 'मिस वर्ल्ड' झालीये याचा आनंदच,पण तुझ्या अभ्यासाचे काय'' ?

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - आई वडिलांना आपल्या मुलाने यशाच्या शिखराला गवसणी घातल्यावर होणारा आनंद वेगळाच असतो. त्या भावना आनंदाश्रुने व्यक्त केल्या जातात. आपल्या क्षेत्रातील सर्वोच्च शिखर प्राप्त केल्यांनंतरही त्यापुढे काय? असा प्रश्न विचारल्यानंतर नेमकं काय उत्तर द्यायचे हे ठरवता येत नाही. आपली मुलगी मिस वर्ल्ड झाल्यावरही आईने जेव्हा पण तुझ्या अभ्यासाचे काय'' ? असा प्रश्न विचारला तेव्हा त्या अभिनेत्रीला काय बोलावे हे सुचेना.

ही गोष्ट आहे बॉलीवूडमधल्या प्रसिध्द अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिची. ती 20 वर्षांपूर्वी मिस वर्ल्ड झाली. तिने हा मानाचा किताब जिंकल्यावर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला. यानंतर पुढील काही वर्षांनी तिच्यासाठी बॉलीवूडची दारे खुली झाली. प्रियंकाने नुकताच तो 20 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्यात प्रियंकाची आई मधु चोप्रा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, ज्यावेळी मला प्रियंका मिस वर्ल्ड झाल्याचे समजले तेव्हा मला खुप आनंद झाला. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते. मला त्यावेळी नेमकं काय बोलावे हे कळेना.

2000 साली प्रियंकाने मिस वर्ल्ड होण्याचा बहुमान मिळवला. केवळ तिच्यासाठी नव्हे तर पूर्ण देशासाठी ही आनंदाची बाब ठरली होती. ज्यावेळी ही स्पर्धा सुरु होती त्याप्रसंगी प्रियंकाचे आई वडिलही उपस्थित होते. प्रियंका मिस वर्ल्ड झाल्यावर तिच्या आई वडिलांची प्रतिक्रिया माध्यमांनी घेतली. तेव्हा प्रियंकाच्या आईने तिला एक गंमतीशीर प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या,  मला प्रियंकाची गळाभेट घ्यायची होती. मला रडु येत होते. अखेर जेव्हा मी तिला भेटले तेव्हा एक वेड्यासारखा प्रश्न विचारला. आता हे जाणवते. आपली मुलगी मिस वर्ल्ड झाली आहे याच्या तिला शुभेच्छा देण्याऐवजी तिच्या अभ्यासाची चिंता करत होते. '' 'मिस वर्ल्ड' झालीये याचा आनंदच, पण तुझ्या अभ्यासाचे काय'' ? असे मी प्रियंकाला विचारला होता.

प्रियंकाचा भाऊ सिध्दार्थ हा त्यावेळी 11 ते 12 वर्षांचा होता. तो म्हणाला, माझ्या मनात त्यावेळी संमिश्र भावना होत्या. माझी बहिण जिंकली याचा मला आनंदच होता. मात्र त्यावेळी मला अभ्यासासाठी अमेरिकेला जावे लागणार होते.