शक्तिमान म्हणतो, ' घराबाहेर पडणे हेच मुळी महिलांच्या समस्येचे मुख्य कारण'

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

मुकेश खन्ना यांनी महिलांवर होणारे अत्याचार याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचे कारण त्यांनी महिलांचे घराबाहेर पडणे हे असल्याचे सांगितले. महिलांचे घराबाहेर पडणे हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे.

मुंबई - मी टू च्या प्रकरणांवर आपली प्रतिक्रिया देताना शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनाच एका मोठ्या वादाला सामोरे जावे लागत आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या त्यांच्या मतावरुन ते टीकेचे धनी होत आहेत. मुकेश खन्ना यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मी टू वर आपले मत नोंदवले आहे. खन्ना हे सोशल मीडियावर सतत सक्रिय असून समाजात घडणा-या वेगवेगळ्या घटनांवर प्रतिक्रिया देण्यात ते पुढाकार घेतात.

मुकेश खन्ना यांनी महिलांवर होणारे अत्याचार याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचे कारण शोधताना त्यांनी महिलांचे घराबाहेर पडणे असे सांगितले आहे. महिलांचे घराबाहेर पडणे हे त्यांच्यासाठी धोकादायक आहे. आणि सगळ्या समस्यांचे मुख्य कारण ते आहे. अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्ये करुन मुकेश खन्ना कायम चर्चेत असतात.यावरुव त्यांना अनेकदा वादाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ते कपिल शर्माच्या शो वर केलेल्या टीकेमुळे चर्चेत आले होते. त्यावरुन त्यांना त्यांचे सहकलाकार गजेंद्र चौहान यांनी लक्ष्य केले होते. त्या दोघांमधील वाद अद्याप सुरु आहे.

आता मुकेश खन्ना यांचा एक जुना व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी मी टू वर आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यांच्या अशाप्रकारच्या प्रतिक्रियेमुले त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यात ते म्हणतात, महिलांचे घराबाहेर पडणे हे त्यांच्या समस्येचे मुख्य कारण आहे. केवळ यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यांच्या या विधानाला मी टू च्या चळवळीशी जोडले आहे. ते म्हणतात, जेव्हापासून महिलांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केली तेव्हापासून या मी टू ला सुरुवात झाली. आता भलेही महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी यासगळ्यात घरात असलेल्या त्या लहान मुलाला आईचा विरह सहन करावा लागतो. हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही.

मुकेश खन्ना यांनी असेही म्हटले आहे की, 'मर्द मर्द होता है और औरत,औरत रहती है' या विधानावरुन मुकेश खन्ना नेटक-यांकडून ट्रोल होऊ लागले आहेत. आपल्या या जून्या व्हिडीओमुळे तयार झालेल्या नव्या वादाला मुकेश खन्ना कशाप्रकारे सामोरे जातात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem after women left kitchen and started working