Madhu Mantena Wedding: वयाच्या 48 व्या वर्षी बॉलीवुड निर्माता मधु मंटेना दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर..

मधु मंटेना इरा त्रिवेदीसोबत अडकला लग्नबंधनात..
Madhu Mantena Ira Trivedi Wedding shared photos
Madhu Mantena Ira Trivedi Wedding shared photos sakal

Madhu Mantena Ira Trivedi Wedding : बॉलिवूड मधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता मधु मंटेना वयाच्या 48 व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. योग प्रशिक्षक इरा त्रिवेदीसोबत त्याने विवाह केला आहे.

मधु आणि इराच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याआधी, मधु मंटेना फॅशन डिझायनर मसब्बा गुप्ता सोबत विवाह बंधनात अडकला होता

(Madhu Mantena Ira Trivedi Wedding shared photos )

Madhu Mantena Ira Trivedi Wedding shared photos
Meera Joshi Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अपघात..

लग्नानंतर इरा त्रिवेदीने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये इरा आणि मधु यांचा शाही विवाह सोहळा दिसून येतो. अत्यंत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्यात मधु आणि इरा दोघांनीही खास लुक केला होता.

इराने लग्नाचे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. ती म्हणते, 'आता मी खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले..' इरा आणि मधुच्या या फोटोवर सेलिब्रिटींसह चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खूप खूप अभिनंदन, नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

मधु मंटेनाने फॅशन डिझायनर मसाबा गुप्तासोबत 2015 मध्ये विवाह केला होता. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. लग्नानंतर चार वर्षांतच घटस्फोट घेऊन दोघेही वेगळे झाले. त्यानंतर मसाबा जानेवारी 2023 मध्ये 'बॉम्बे वेलवेट' फेम सत्यदीप मिश्रासोबत लग्नबंधनात अडकली.

Madhu Mantena Ira Trivedi Wedding shared photos
Bhau Kadam Birthday: जेव्हा दागिने मोडून भाऊने मुलांसाठी केली होती 'ही' गोष्ट.. वाचून वाटेल अभिमान!

सत्यदीप आणि मसाबा दोघांचही हे दुसरं लग्न होतं. सत्यदीपने आधी आदिती राव हैदरीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर आता काही महिन्यातच मधुने देखील इरा सोबत दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.

मधु-इराच्या लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. (bollywood news) यामध्ये अभिनेत्री सोनाली बेंद्रे, गोल्डी बहल, ऋतिक रोशन, सबा आजाद, हुमा कुरैशी, जहीर इकबाल, सोनाक्षी सिन्हा, राजकुमार राव, पत्रलेखा, अनुपम खेर, अनिल कपूर, राकेश रोशन, अल्लू अर्जुन, अलाया एफ, आशुतोष गोवारिकर, राहुल बोस, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, मधुर भंडारकर, कार्तिक आर्यन, रकुल प्रीत सिंह, जिनिलिया देशमुख या सेलिब्रिटींचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com