Kalki Project K Prabhas: एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणाऱ्या 'प्रोजेक्ट के' चा टीझर.. प्रभास, अमिताभ, दीपीका

चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के' नसून 'कल्की 2898 एड' असेल
project k kalki teaser out now starring prabhas deepika padukon amitabh bachchan kamal haasan
project k kalki teaser out now starring prabhas deepika padukon amitabh bachchan kamal haasan SAKAL
Updated on

Project K Kalki Teaser News: सध्या इंडस्ट्रीत 'प्रोजेक्ट के'ची चर्चा जोरात आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि प्रभास स्टारर सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. आणि आता त्याच्या टीझर प्रेक्षकांच्या समोर आलाय. आता या चित्रपटाचे नाव 'प्रोजेक्ट के' नसून 'कल्की 2898 एड' असेल. याशिवाय या चित्रपटाच्या टीझरमध्येही बरेच काही दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे चाहत्यांना चित्रपटाच्या कथानकाची कल्पना आली आहे.

(Project K Kalki teaser out now)

project k kalki teaser out now starring prabhas deepika padukon amitabh bachchan kamal haasan
Khalapur landslide: 'कष्टं करुन मानाने जगतात ही ठाकरं', इर्शाळवाडीतील दुर्घटनेनंतर मराठी अभिनेत्रीची भावूक पोस्ट

साय-फाय अॅक्शन चित्रपट 'प्रोजेक्ट के'चे नाव आता 'कल्की 2898 एडी' असे ठेवण्यात आले आहे. आधी 20 जुलैला अमेरिकेत आणि आता 21 जुलैला सकाळी भारतात या चित्रपटाची पहिली झलक दाखवण्यात आली. यूट्यूबवर आलेला हा टीझर 6 तासांत 1.6 मिलीयन लोकांनी पाहिलाय. मेकर्सने सुरुवातीला त्याचे अनेक पोस्टर्स आणि दीपिकाचा फर्स्ट लुक रिलीज केला होता. जे चाहत्यांना विशेष आवडले नाही. मात्र आता टीझर रिलीज करून चित्रपटाची कथा समोर आली आहे.

टीझरमध्ये लिहिलेल्या ओळींनुसार, जेव्हा अंधार जग व्यापेल तेव्हा एक शक्ती उदयास येईल. शेवट आता सुरू होतो. जिथे दीपिका आर्मी जॉईन करताना दिसत आहे. त्याचवेळी अमिताभ बच्चन पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेले दिसत आहेत. त्यांचे फक्त डोळे दिसतात. त्याचवेळी प्रभासचाही योद्धा म्हणून प्रवेश होतो. तो जगाला वाचवण्यासाठी येतो. येथे असे म्हणता येईल की ज्या प्रकारे कलियुगात अत्याचार शिगेला पोहोचतील आणि त्यानंतर भगवान कल्की अवतरतील. तसेच या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Shaktipeeth corridor
Devrani-Jethani Rivalry, Folk Art and Freedom Struggle: The Legacy of Gulabo-Sitabo
Why Mumbai-Goa Highway work is delayed
From Cinema to Power: Vijay Redefines Political Success in Tamil Nadu
Marathi News Esakal
www.esakal.com