Ramayan Serial: भारतीयांसाठी आनंद..! रामायण मालिकेतील या एपिसोडने केला वर्ल्ड रेकॉर्ड

रामायण मालिकेने आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलाय.
ramayan, ramayan serial, ramayan record break, ramayan full episode
ramayan, ramayan serial, ramayan record break, ramayan full episodeSAKAL

Ramayan Serial News: रामानंद सागर यांची रामायण मालिका कोणाला ठाऊक नाही अशी व्यक्ती सापडणं कठीण. ८० च्या दशकात, दर रविवारी टीव्हीवर रामायण या मालिकेचे टेलिकास्ट झाल्यावर रस्त्यावर शांतता असायची.

लोक पूर्ण श्रद्धेने आंघोळ करून टीव्हीसमोर बसायचे. मालिकेतील पात्र प्रत्येक घराघरात चर्चेचा विषय बनले होते. या मालिकेची क्रेझ इतकी आहे की लॉकडाऊन 2020 मध्ये पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली,

जेव्हा कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण लॉकडाऊनमध्ये रामायण मालिका टीव्ही वर दाखवली गेली आणि तिने रेकॉर्डब्रेक टीआरपी मिळवला.

आता रामायण मालिकेने आणखी एक रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलाय.

(proud moment for Indians..! This episode of Ramayana made a world record)

ramayan, ramayan serial, ramayan record break, ramayan full episode
Prajakta Mali: प्राजक्ता माळी साठी हास्यजत्रा फेम सचिन गोस्वामींनी घेतला मोठा निर्णय

लक्ष्मण म्हणजेच रामायणातील सुनील लाहिरी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून लोकांना आठवण करून दिली आहे की 3 वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच 16 एप्रिल 2020 रोजी रामायणाचा तो भाग प्रसारित झाला होता ज्यामध्ये लक्ष्मण आणि मेघनादचे युद्ध दाखवले होते.

या एपिसोडला चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बल 77.7 दशलक्ष व्ह्यूअरशिप मिळाले. म्हणजेच तेव्हा साडेसात कोटीं पेक्षा जास्त लोकांनी ते पाहिले, हा एक जागतिक विक्रम होता.

ramayan, ramayan serial, ramayan record break, ramayan full episode
आयुष्य बिनधास्त जगायचं अन् Amruta Deshmukh सारखं गोड हसायचं

प्रेक्षकांचे आभार मानताना, रामायणात लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुनील लाहिरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे – या दिवशी म्हणजेच 16 एप्रिल 2020 रोजी, रामायणातील लक्ष्मण-मेघनाथ युद्ध प्रकरणाने एक जागतिक विक्रम रचला.

77.7 दशलक्ष प्रेक्षकांचे याविषयी आभार, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झाले आहे. यासोबतच त्यांनी लक्ष्मण आणि मेघनाद यांच्यातील युद्धाच्या दृश्याची काही झलकही शेअर केली.

या मालिकेत सुनील लाहिरी यांनी लक्ष्मणची भूमिका केली होती, तर विजय अरोरा मेघनाथची भूमिका साकारत होते. मालिकेतील सर्व कलाकार त्यांनी साकारलेल्या पात्रांसाठी कायमचे अजरामर झाले.

काही लोक आजही अरुण गोविल यांना भगवान राम मानतात आणि त्यांना पुन्हा एकदा त्याच रूपात येण्याचे आवाहन करतात. क्वचितच कोणत्या मालिकेच्या कलाकारांना प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळाले आहे.

रामायण मालिका जेव्हा पुन्हा टीव्हीवर दाखवली गेली तेव्हा हे सर्व कलाकार कपिल शर्मा शो मध्ये आले होते. त्यावेळी या कलाकारांनी अनेक किस्से उलगडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com