ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मराठी चित्रपटांसाठी अनुदान द्यावे; मराठी चित्रपट महामंडळाची मागणी

संतोष भिंगार्डे
Monday, 10 August 2020

मराठीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे पूर्ण पैसे वसूल होत नाहीत. निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केली आहे.

मुंबई ः कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी ठप्प झाली होती. आता टीव्ही मालिकांबरोबरच चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र चित्रपटगृहे अजूनही बंद आहेत. ती कधी उघडतील हे काही सांगता येत नाही. त्यामुळे. मराठी निर्मात्यांचे अतोनात  नुकसान होत आहे. ज्या निर्मात्यांचे चित्रपट तयार होते त्यांनी नाईलाजास्तव ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले
आहेत. गुंतवलेले पैसे थोडे का होईना रिकव्हर व्हावेत व देणी देता यावीत हाच त्यामागील हेतू आहे. मराठीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे पूर्ण पैसे वसूल होत नाहीत. निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केली आहे.

सुशांतचे कुटुंबिय संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा - 

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा’चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना निवेदनाद्वारे
विनंती केली आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज कराव्या लागलेल्या चित्रपटांना आपण अनुदान योजनेत सामावून घ्यावे. जेणेकरून त्या चित्रपटाच्या निर्मात्यांना हातभार लागेल व ते आणखी चित्रपट निर्मिती करू शकतील.

रिव्ह्यु: पुरुषीपणाला सणसणीत उत्तर गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल - 

 ते पुढे म्हणतात, की महाराष्ट्र शासनाची अनुदान योजना अशा वेळी निर्मात्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. परंतु ज्या निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटीवर रिलीज केले आहेत. त्यांचे चित्रपट आता  चित्रपटगृहात रिलीज होऊ शकत नाहीत. कारण आता त्या चित्रपटांना प्रेक्षक मिळू शकणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या जीआर नुसार चित्रपटगृहात रिलीज (१०आठवडे) झालेल्या
चित्रपटांनाच अनुदान मिळू शकणार आहे. परंतु आता ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही अनुदान मिळाले पाहिजे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Provide grants for Marathi films on OTT platform; Demand of Marathi Film Corporation