Adipurush: सैफला पाहून भडकला महाभारतातील दुर्योधन; पुन्नीत इस्सर म्हणाले,'हा तर...' Puneet Issar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Puneet Issar opinion on saif ali khan's ravana look in Adipurush

Adipurush: सैफला पाहून भडकला महाभारतातील दुर्योधन; पुन्नीत इस्सर म्हणाले,'हा तर...'

Adipurush Controversy: प्रभास आणि सैफ अली खान अभिनित 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर रिलिज झाला अन् त्यानंतर लोकांचा त्यावरचा राग थांबायचं काही नाव घेईना. रामायणातील कथानकावर आधारित या सिनेमाची व्यक्तिरेखा आणि व्हीएफक्सला पाहून आता लोक त्यावर नाराजगी व्यक्त करताना दिसत आहेत. सिनेमात रावणाच्या भूमिकेतील सैफ तालिबानी लूकमध्ये आणि हनुमान चामड्याचा बेल्ट अंगावर घालून दिसला अन् सोशल मीडियावर नवा वाद पेटला. आता यावर महाभारतातील दुर्योधनाची भूमिका करणाऱ्या पुनीत इस्सर यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.(Puneet Issar opinion on saif ali khan's ravana look in Adipurush)

हेही वाचा: Adipurush: प्रभासच्या 'आदिपुरुष'मध्ये राम-रावण नाहीत,तर भाव खाऊन गेला हनुमान; मराठी अभिनेत्याचीच हवा

पुनित इस्सर म्हणाले की, रावण अतिशय ज्ञानी होता,जर त्याच्या माथ्यावर गंध नाही तर समजून चाला तो रावणच नाही. बी.आर.चोप्रा यांच्या महाभारतात दुर्योधनाची भूमिका साकारणाऱ्या पुनीत इस्सरना देखील आदिपुरुषमधील रावण खटकला आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना संवाद साधला की,''तुम्ही लोकांच्या श्रद्धेचा भाग असलेल्या एका कथानकावर सिनेमा काढताना गरजेपेक्षा अधिक स्वातंत्र्य घेऊ शकत नाही''.

हेही वाचा: Adipurush: 'मला माहीत होतं सिनेमाला ट्रोल केलं जाणार कारण..',दिग्दर्शक ओम राऊत स्पष्टच बोलला

पुनीत इस्सर यांनी आदिपुरुष वरनं सुरु असलेल्या वादात उडी टाकत लोकांच्या नाराजगीचं समर्थन केलं आहे. मेकर्सनी सिनेमासाठी स्वातंत्र्य घेताना इतिहासाचं खंडन करण्याचं धाडस केलंय जे पूर्णपणे चुकीचं आहे असं पुनीत यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की,''रावण जो ४ वेद आणि ६ शास्त्रांचा ज्ञाता होता, त्याच्यापेक्षा मोठा शिवभक्त कोणी झाला नाही आणि अशा रावणाच्या माथ्यावर जर गंध लावलेलं दाखवलं नाही तर मग तो रावण कसला?''

हेही वाचा: Adipurush: रावणाचा लूक पाहून भडकल्या जुन्या सीतामय्या; म्हणाल्या,'रावण लंकेचा होता तर मग... '

पुनीत यांनी मेकर्ससाठी एक प्रश्न उपस्थित करत म्हटलं आहे की,''सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली तुम्ही शिख गुरुंना दाढी-मिश्यांशिवाय दाखवाल का? मग रावणासोबत असं का केलं? तुमच्या सिनेमातला रावण तर एकदम अल्लादिन खिलजी आणि तैमूर दिसत आहे. त्यामुळे लोकांचा जो राग आहे तो योग्य आहे यावरचा. मेकर्सना यागोष्टी लक्षात ठेवून सगळं करायला हवं होतं''.

हेही वाचा: Adipurush: 'तुझ्या धर्माचा,धार्मिक व्यक्तिरेखांचा खेळ करशील का?', सैफवर भडकले मुकेश खन्ना

पुनीतचा राग इथेच थांबला नाही. ते म्हणाले,''टीझरमध्ये प्रभु रामचंद्रांना तुम्ही मिश्या दाखवता,पण रावणाच्या केसांना छान हेअर कट करुन स्पाइक्स लूक दिलाय,तालिबानी दिसतोय तो. रावणाला तालिबानी का बनवलंय?''