Tanya Abrol Wedding: चक दे इंडिया मधल्या पंजाबी कुडीचं थाटामाटात झालं लग्न, एकत्र आल्या सर्व अभिनेत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chak de india, tanya abrol wedding

Tanya Abrol Wedding: चक दे इंडिया मधल्या पंजाबी कुडीचं थाटामाटात झालं लग्न, एकत्र आल्या सर्व अभिनेत्री

Chak De India Girl Tanya Abrol Weddding News: चक दे इंडिया सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमा शाहरुख खानच्या दर्जेदार अभिनयामुळे जरी ओळखला जात असला तरीही सिनेमातल्या सर्व अभिनेत्रीचं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान आहे.

चक दे इंडियातली कोमल चौटाला म्हणजेच अभिनेत्री चित्राशी रावत हीच नुकतंच लग्न झालं. आता चक दे इंडिया मधल्या आणखी एका अभिनेत्रींचं लग्न झालं. हि अभिनेत्री म्हणजे चक दे इंडियातली पंजाबी कुडी बलबीर कौर म्हणजेच अभिनेत्री तान्या अब्रोल.

(Punjabi Kudi from Chak De India got married in a grand manner)

तान्याचं नुकतंच लग्न झालं असून तिच्या लग्नाला चक दे इंडियाची संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती. तान्याची हळद आणि लग्नात चक डे इंडियातल्या अभिनेत्रींनी धम्माल केली. यावेळी सिनेमातील अभिनेत्री विद्या माळवदे, शिल्पा शुक्ला, सीमा आझमी, आर्या मेनन, चित्राशी रावत उपस्थित होत्या.

तान्याच्या लग्नाच्या निमित्ताने चक दे इंडियातल्या अभिनेत्रींचं खास रियुनियन झालं. एकूणच सिनेमा रिलीज होऊन अनेक वर्ष झाली असली तरीही सिनेमातल्या अभिनेत्रींची पडद्यामागे छान मैत्री असलेली दिसून येतेय.

तान्याने पंजाबी थाटामाटात लग्न केलं. अर्पित तुली असं तान्याच्या नवऱ्याचं आहे. अर्पित Chartered Financial Analyst आहे. लग्नात तान्याने खास गुलाबी रंगाची साडी नेसली होती.

अभिनेता अभिनव शुक्ला आणि बिग बॉस फेम अभिनेत्री रुबैना डीलेक तान्याच्या लग्नाला उपस्थितीत होते. तान्याने मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीत आणि लग्नात धम्माल केली.

चक दे इंडिया सिनेमात रागीट आणि रांगडी मुलगी बलबीर कौरची भूमिका अभिनेत्री तान्या अब्रोलने साकारली. सिनेमात तान्याचा राग शाहरुख खान शांत करत असतो. तान्याने बलबीरच्या भूमिकेत सुंदर अभिनय केलाय.

तान्याचं लग्नात चक दे इंडिया सिनेमातल्या सहअभिनेत्रींनी हजेरी लावून तिच्या लग्नाला चार चांद लावले. चक दे इंडिया सिनेमानंतर सिनेमातल्या सर्व अभिनेत्री वैयक्तिक आणि व्यावसायीक आयुष्यात यशस्वी आहेत. सिनेमातील काही अभिनेत्री अजूनही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत

टॅग्स :Marathi News Bollywood