पंजाबी कुडी इलियाना... 

संकलन -भक्ती परब  
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

इलियाना डिक्रूज आणि पंजाबी कुडी? हे कसं शक्‍य आहे. ती तर गोवन गर्ल आहे ना. हो खरंय हे. पण ती आता बऱ्यापैकी पंजाबी कुडी झालीय. त्याचं झालंय असं तिने नुकतच "बादशाहो' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. रुस्तम सिनेमानंतर इलियाची जादू काहीशी ओसरू लागली होती; पण आता तिचे दोन सिनेमा एका पाठोपाठ एक येणार आहेत. त्यामुळे इलियाना मॅडम खूश आहेत. "बादशाहो'मध्ये अजय देवगण आणि "मुबारका' सिनेमात अर्जुन कपूरसोबत ती दिसणार आहे. इलियाना भूमिकांची निवड मोजूनमापून करत असते. त्यामुळे तिनं आतापर्यंत जशा भूमिका केल्या, त्यापेक्षा वेगळ्या भूमिका तिला यापुढे करायच्या आहेत.

इलियाना डिक्रूज आणि पंजाबी कुडी? हे कसं शक्‍य आहे. ती तर गोवन गर्ल आहे ना. हो खरंय हे. पण ती आता बऱ्यापैकी पंजाबी कुडी झालीय. त्याचं झालंय असं तिने नुकतच "बादशाहो' सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. रुस्तम सिनेमानंतर इलियाची जादू काहीशी ओसरू लागली होती; पण आता तिचे दोन सिनेमा एका पाठोपाठ एक येणार आहेत. त्यामुळे इलियाना मॅडम खूश आहेत. "बादशाहो'मध्ये अजय देवगण आणि "मुबारका' सिनेमात अर्जुन कपूरसोबत ती दिसणार आहे. इलियाना भूमिकांची निवड मोजूनमापून करत असते. त्यामुळे तिनं आतापर्यंत जशा भूमिका केल्या, त्यापेक्षा वेगळ्या भूमिका तिला यापुढे करायच्या आहेत. म्हणूनच "मुबारका' सिनेमात स्विटी नावाच्या पंजाबी मुलीच्या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर तिला ते आव्हान वाटलं. "बर्फी' सिनेमात तिनं बंगाली भूमिकेचा आनंद घेतला. तशाच प्रकारे ती आता पंजाबी कुडी बनून आनंद लुटणार आहे. ती पंजाबी भूमिका करणार म्हणून तिच्या जवळच्या मित्र परिवारातील सर्वांनाच आश्‍चर्य वाटलं; पण तिनं सेटवर आपल्या अभिनयाचा पंजाबी तडका लगावल्यावर मग साऱ्यांनाच खात्री पटली. मग काय मानलं बुवा तुला, असं म्हणण्याशिवाय ते काहीच करू शकले नाही. आता बघुया इलियानाचा पंजाबी अंदाज कसा असणारेय ते... 
 

Web Title: punjabi kudi ileana d'cruz