"अन् दुसऱ्याच दिवशी मामा गेला"; पुष्कर जोगला अश्रू अनावर

"हेवेदावे, मतभेद दूर ठेवून नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या संपर्कात राहा"
Pushkar Jog
Pushkar Joginstagram

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता पुष्कर जोग Pushkar Jog याच्या मामांचं नुकतंच निधन झालं. पुष्करच्या मामाने त्याला कॉल केला होता, मात्र काही कारणास्तव तो उचलू शकला नव्हता आणि नंतर कॉलबॅकही करू शकला नव्हता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मामाच्या निधनाची बातमी त्याला समजली. याबद्दल बोलताना पुष्करला अश्रू अनावर झाले. 'हेवेदावे, मतभेद बाजूला ठेवून नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या, कुटुंबीयांच्या संपर्कात राहा', अशी विनंती त्याने चाहत्यांना केली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पुष्करने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. (pushkar jog cried while talking about his late uncle)

"१३ एप्रिल रोजी म्हणजेच पाडव्याच्या दिवशी मला माझ्या गोव्याच्या मामाचा फोन आला. माझी विचारपूस केली. काळजी घे म्हणाला. त्यानंतर २१ एप्रिलला सकाळी ८ वाजता पुन्हा मामाचा मला फोन आला. पण लवकर उठायची सवय नसल्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही आणि इतर कामांमुळे त्याला कॉलबॅक करायचं राहून गेलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ एप्रिलला मामाच्या निधनाची बातमी समजली. मी त्याचा फोन का नाही उचलला, या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. आपल्याला नातेवाईकांचा, मित्रांचा फोन येतो, तेव्हा अनेकदा आपण म्हणतो, जाऊ दे, नंतर बोलू. पण आता मिस्ड कॉल नको. त्यांना कॉलबॅक करा आणि त्यांची विचारपूस करा", अशा शब्दांत तो व्यक्त झाला.

Pushkar Jog
आवाज कोणाचा? मराठी इंडस्ट्रीतील दोन तरुणांचा यशस्वी प्रवास

'मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो. आज थोडी हिंमत झाली. काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याचा पोस्ट मी टाकला होता. त्या वेळेसचा मिस्ड कॉल माझं मन अजूनही खात आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कृपा करून एकमेकांच्या संपर्कात रहा. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये हे योग्य नाही. हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे. तेव्हा हेवेदावे, रुसवे फुगवे, वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार व आप्त स्वकीयांच्या संपर्कात रहा. कॉल, मेसेज तर कधीच कुणाचा मिस करू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे,' असं त्याने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com