Pushpa 2 Relased Date : पुष्पाच्या नव्या पोस्टरमध्येच दडलयं 'टॉप सिक्रेट'! बोटाला 'नेलपॉलिश' लावून सांगायचयं तरी काय?

१७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लु अर्जूनचा पुष्पा प्रदर्शित झाला होता.
Pushpa 2 Relased Date
Pushpa 2 Relased Date esakal

Allu Arjun 2 Released Date Makers X post viral : अल्लू अर्जूनच्या पुष्पाच्या मेकर्सनं आता नवी तारीख जाहीर केली आहे. एक्सवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पुष्पाच्या पहिल्या भागानं प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली होती. इतक्या दिवसांपासून प्रेक्षक त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

१७ डिसेंबर २०२१ रोजी अल्लु अर्जूनचा पुष्पा प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावरही घेतले होते. आता या चित्रपटाचा दुसरा भाग याच वर्षीच्या शेवटच्या महिन्यात येणार असे सांगण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. मेकर्सनं खास पोस्ट शेयर करुन ही माहिती दिली आहे.

पुढील वर्षी ऑगस्टमध्ये ( १५ ऑगस्ट २०२४) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. यासगळ्यात अल्लु अर्जूनच्या नव्या पोस्टरनं लक्ष वेधून घेतले आहे. अल्लु अर्जूनचा लूक, त्यानं बोटावर लावलेली नेलपॉलिश हे सारं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

यापूर्वी देखील अल्लू अर्जूनचा पुष्पा २मधील एक लूक व्हायरल झाला होता.त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. अल्लूच्या त्या फोटोला सात मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. त्यावरुन त्याची आणि पुष्पाच्या सिक्वेलची लोकप्रियता येते.

सात मिलियनपेक्षा जास्त लाईक्स मिळणारा पहिला भारतीय चित्रपट पोस्टर असे म्हणून नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या. मेकर्सनं ती पोस्ट शेयर करताना म्हटले होते की, आयकॉन अल्लूची झलक तुम्हाला वेडं केल्याशिवाय राहणार नाही.

Pushpa 2 Relased Date
Shah Rukh Khan Jawan : 'जवान संसदेत दाखवण्याची मोदी सरकारची हिंमत आहे का?' किंग खानच्या चित्रपटाला आता राजकीय वळण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com