Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 मध्ये साई पल्लवीची एन्ट्री! रश्मिकाचा पत्ता कट?

साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाबाबत सतत अपडेट्स येत आहेत. आता या चित्रपटात सई पल्लवीची एंट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Pushpa 2 The Rule
Pushpa 2 The RuleEsakal

टॉलिवुड चित्रपटांचा सध्या भारताच नव्हे तर सगळ्या जगातच बोलबाला सुरु आहे. आरआरआर हा चित्रपटाने तर आता थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. आता हा चित्रपट भारतासाठी ऑस्कर आणेलचं अशी आशा प्रत्येक भारतीयाला लागून आहे. मात्र या बरोबरच अल्लू अर्जुनचा पुष्पा या चित्रपटानंही मार्केट चांगलच जाम केलं होतं. 'मै झुकेगा नही साला' हा डॉयलॉग तर सर्वांच्याच ओठावर होता.

या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले असून आता चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची प्रतिक्षा करत आहेत. कमाईच्या बाबतीतही या चित्रपटाने चांगली कमाई केली.

Pushpa 2 The Rule
Women's Day Special: बॉलिवुडच्या 'या' क्वीन ज्यांनी इंडस्ट्री गाजवली..

आता त्याच्या दुसऱ्या भागावर काम सुरू आहे, या चित्रपटाचं नावं 'पुष्पा द रुल' असे ठेवण्यात आले आहे. चित्रपटाबाबतच एक अपडेट समोर आले आहे. याता या चित्रपटात साऊथची सुंदर अभिनेत्री साई पल्लवी एन्ट्री करणार आहे. या चित्रपटातील एका खास भूमिकेत ती दिसणार आहे.

Pushpa 2 The Rule
Drishyam 3 साठी अजय देवगणनं घातली 'ही' अट.. म्हणाला,'मोहनलालचा 'दृश्यम 3' जेव्हा शूट होईल तेव्हा..'

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, या चित्रपटात साई मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या भागात राधिका म्हणजेच रश्मिका मंदाना राहणार आहे, परंतु अल्लूच्या विरूद्ध सई पल्लवी देखील दिसणार आहे. या सिनेमात तिची भूमिका एक कॅमिओ असल्याचा दावा करण्यात येच आहे. एका आठवड्यात ती या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

सध्या 'पुष्पा 2' मधील साईच्या भूमिकेबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र ही बातमी ऐकल्यानंतर नक्कीच चाहत्यांमध्ये नक्किच आनंद होईल. या चित्रपटाद्वारे सई पहिल्यांदाच अल्लूसोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे. ही जोडी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नसेल.

Pushpa 2 The Rule
Pushpa 2 The Rule : रिलीजपुर्वीच पुष्पानं तोडलं रेकॉर्ड, RRR ला टाकलं मागे! देशभरातील...

पुष्पा 2 बद्दल बोलायचे झालं तर फहाद फाजिल आणि अल्लू अर्जुन यांच्यात टक्कर होणार आहे. तो चित्रपटाच्या पहिल्या भागातही होता आणि यावेळी त्याची भूमिका अधिक तीव्रतेची असणार आहे. या चित्रपटाशिवाय त्यांच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे, ज्याचे नाव AA23 आहे. रिपोर्ट्सनुसार हा सिनेमा 2025 मध्ये रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com