Jagadeesh Confessed Crime: 'पुष्पा' फेम जगदीशने दिली गुन्ह्यांची कबुली! तरुणीला ब्लॅकमेल करुन....

'पुष्पा' चित्रपटात अल्लू अर्जुनचा मित्र केशवची भूमिका साकारणार्‍या अभिनेता जगदीशने शेवटी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Jagadeesh Confessed Crime
Jagadeesh Confessed CrimeEsakal
Updated on

Jagadeesh Confessed Crime: एकीकडे पुष्पा 2 चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत तर दुसरीकडे चित्रपटात अल्लू अर्जुनचा मित्र केशव यांची भूमिका साकारणार्‍या जगदीश बाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

एका महिलेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप जगदीशवर करण्यात आला होता. 6 डिसेंबर रोजी जगदीशला अटक करण्यात आली.

जगदीशला पंजागुट्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याला न्यायालयात सादर केल्यानंतर चिंचल्लागुडा मध्यवर्ती तुरूंगात पाठवण्यात आले होते.

हे प्रकरण 29 नोव्हेंबरचे आहे. एका महिला कलाकाराने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्या महिलेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केली आणि तेव्हा तपासात जगदीश बाबत उलगडा झाला. जगदीशकडे त्या महिलेचे काही खासगी फोटो होते ज्याचा वापर करुन त्याने महिलेला ब्लॅकमेल केले. या त्रासाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं.

Jagadeesh Confessed Crime
Ankita Lokhande Birthday: कोण म्हणतं अंकिताला अभिनेत्री बनायचं होतं..तिला तर... जाणून घ्या Unknown Fact

Abp ने दिलेल्या वृत्तानुसार, आता जगदीशने गुन्ह्याची कबुली दिली आहे. यासोबतच त्याने कबूल केले की त्याने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो चुकीच्या हेतूने काढले. इतकच नाही तर हे फोटो लीक करेल अशी धमकी देत तिला ब्लॅकमेल केले.

त्याने पुढे कबूल केले की, ती महिला दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात होती. जे जगदीशला आवडले नाही. जगदीश त्या महिलेला पाच वर्षापासून ओळखत होता. मात्र 'पुष्पा' नंतर ते दोघे वेगळे झाले होते. मात्र तो त्या महिलेला ब्लॅकमेल करत राहिला आणि शेवटी कंटाळून त्या महिलेने आत्महत्या केली.

Jagadeesh Confessed Crime
Tanuja Health Update: काजोलची आई ज्येष्ठ अभिनेत्री तनुजांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! ICUमध्ये सुरु होते उपचार

महिलेच्या आत्महत्येनंतर जगदीशला ताबडतोब ताब्यात घेण्यात आले होते. त्याला 14 दिवस रिमांडमध्ये पाठवण्याचा आदेश कोर्टानं दिला होता. मात्र आता 14 दिवस पूर्ण होण्यापूर्वी जगदीशने गुन्ह्याची कबुली दिली.

जगदीशच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 2018 मध्ये 'निर्विचा नतुलू' या चित्रपटासह अभिनय पदार्पण केले. यानंतर तो 2019 च्या 'मल्लेशहॅम' चित्रपटात आणि 2020 मध्ये रिलीज झालेल्या 'पलासा' चित्रपटात दिसला. 2021 मध्ये त्याने केशवची भूमिका साकारली 'पुष्पा: द राइज' आणि आता 'पुष्पा: द रुल' मध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com