esakal | माझ्या बायोपिकमध्ये दीपिकानेच काम करावे- पी. व्ही. सिंधू
sakal

बोलून बातमी शोधा

pv sindhu,deepika padukone

माझ्या बायोपिकमध्ये दीपिकानेच काम करावे- पी. व्ही. सिंधू

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू नेहमीच तिच्या खेळाने भारताचे नाव जागतिक पातळीवर उंचावते. काही दिवसांपूर्वी सिंधूने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सिंधूने सुवर्णपदक मिळवले आहे. एका मुलाखतीमध्ये सिंधूला तिच्या आयुष्यावर आधारित चित्रपट तयार झाला तर त्यामध्ये कोणती अभिनेत्री तिची भूमिका साकारलेलं आवडेल, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सिंधूने उत्तर दिले, 'माझा बायोपिक आला तर त्यामध्ये दीपिका पदुकोणने माझी भूमिका साकारावी. तिला बॅडमिंटन खेळाबद्दल चांगली माहिती आहे. तसेच मलाही दीपिकाचा अभिनय आवडतो.' (pv sindhu wants deepika padukone to portray her in biopic)

पी व्ही सिंधूची निवड दीपिकाच का?

दीपिकाचे वडिल प्रकाश पदुकोण हे भारतीय माजी बॅडमिंटनपटू आहेत. तसेच अनेक वेळा दीपिका तिच्या वडिलांसोबत बॅडमिंटन खेळाचा सराव करत असते. त्यामुळे पी व्ही सिंधूला दीपीका तिच्या बायोपिकमध्ये उत्तम अभिनय करू शकते असे वाटते.

हेही वाचा: 'या' अभिनेत्री ठरल्या होत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी

लवकरच दीपिका '83' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे कथानक 1983 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला मिळालेल्या ऐतिहासिक विजयावर अधारित आहे. या चित्रपटामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंग साकारणार असून त्यांच्या पत्नीची भूमिका दीपिका साकारणार आहे.

हेही वाचा: आर्चीचा मेकओव्हर पाहून चाहते झाले 'सैराट'!

loading image