Quala Teaser Out:हुबेहूब वडील इरफान खानसारखाच दिसला बाबिल, तेच बोलके डोळे,तोच भोळेपणा Babil Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Quala teaser out babil khan look alike irrfan khan in the clip

Quala Teaser Out:हुबेहूब वडील इरफान खानसारखाच दिसला बाबिल, तेच बोलके डोळे,तोच भोळेपणा

Quala Teaser Out: इरफान खान (Irrfan Khan) बॉलीवूडच्या सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक होता. दुर्दैवानं आता तो आपल्यात जरी नसला तरी त्याच्या सिनेमांच्या माध्यमातून मात्र तो कायम लोकांच्या स्मरणात राहणार हे नक्की. इरफानचा मुलगा बाबिल खान,ज्यानं आपल्या वडीलांचा अभिनयाचा वारसा पुढे नेण्याचा वीडा उचलला आहे तो लवकरच 'काली' सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार आहे.

अन्विया दत्तच्या या सिनेमात तृप्ती डिमरी,स्वस्तिका मुखर्जी आणि अमित सियाल देखील बाबिलसोबत मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. सिनेमाच्या फर्स्ट लूकनं रिलीज आधीच प्रसिद्धि मिळवायला सुरुवात केली आहे. आता सिनेमाचा टिझर आपल्या मनाला भिडेल एवढं नक्की.(Quala teaser out babil khan look alike irrfan khan in the clip)

'काला'च्या टीझरमध्ये बाबिल खानचा पडद्यावरील वावर तुम्हाला थक्क करुन सोडेल एवढं नक्की. अनेक जण बोलताना दिसतायत की बाबिल पडद्यावर आपले दिवंगत वडील अभिनेते इरफान खान यांच्यासारखाच हुबेहूब दिसत आहे. तृप्ती डिमरी देखील खूप सुंदर दिसतेय. तिच्यावर ही लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. १९३० आणि १९४० च्या दशकातील प्रसिद्ध गायकाची कथा या सिनेमात गुंफण्यात आली आहे.

सिनेमाविषयी कालाच्या टीमचं म्हणणं आहे की,''नेटफ्लिक्सवर या सिनेमाला रिलीज करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. या सिनेमाची कथा संगीतात गुंफण्यात आली आहे. जेव्हा मन दुखावतं तेव्हाही ही कहाणी गुणगुणते आणि दुःखातही गायला शिकवते. आम्ही उत्सुक आहोत या सिनेमाविषयी आणि आशा आहे चाहत्यांनाही सिनेमा नक्कीच भावेल. नेटफ्लिक्ससोबत आमचा हा दुसरा सिनेमा आहे,आणि लोक वाट पाहतायत 'काला'ची हे कळल्यावर खूप आनंद होतोय''.

हेही वाचा: 'माझ्या हातात असतं तर मी हिला...', नेहा कक्करवर भडकली फाल्गुनी पाठक, वाचा प्रकरण...

बाबिलनेही आपल्या एका मुलाखती दरम्यान म्हटलं आहे की,''बॉलीवूडमध्ये नेपोटिझम आहे, कारण मला वाटत 'काला' मध्ये ही व्यक्तिरेखा मला साकारायला मिळण्यामागे माझ्या वडीलांचा देखील मोठा वाटा आहे. या प्रवासात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार त्यानं मानले आहेत. त्याचं म्हणणं आहे की, जर तो बॉलीवूडमध्ये बाहेरुन आला असता तर कदाचित इतक्या लवकर त्याला ही संधी मिळाली नसती''.