R Madhavan: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत 'आर.माधवन'?

मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे.
R Madhavan
R Madhavanesakal news

R Madhavan New look viral: मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. एकापाठोपाठ एक येणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवरही चांगले यश मिळाले आहे. यातच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा चित्रपटात साकारण्यासाठी आता बॉलीवूडच्या कलाकारांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे दिसून आले आहे.

काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. त्याच्या मुहूर्त सोहळयाला राजकीय क्षेत्रातील मोठे मान्यवर होते. यासगळयात चर्चा झाली ती बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारची. त्याचे कारण म्हणजे, तो या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहे. अक्षय ही भूमिका करणार म्हटल्यावर त्याच्या नावाला अनेकांची पसंती मिळाली. मात्र यासोबतच त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले गेले.

अक्षयच्या नावाला नेटकऱ्यांनी विरोध केला होता. त्याच्या जाहिराती, त्याच्या भूमिका आणि वक्तव्ये यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आले होते. दुसरीकडे आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी स्क्रिन टेस्ट दिली होती. तो अभिनेता म्हणजे अनेकांचा लाडका मॅडी अर्थात आर माधवन. काही महिन्यांपूर्वी त्याच्या रॉकेट्री चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यासगळ्यात माधवन याचा शिवाजी महाराजांच्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

R Madhavan
Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् 'वीर दौडले सात'! काय आहे कनेक्शन?
R Madhavan
R Madhavanesakal

माधवननं महाराजांच्या भूमिकेसाठी स्क्रिन टेस्ट दिली होती. याविषयी अनेकांना माहिती नव्हते. माधवनने सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून त्याला आजवर न साकारता आलेल्या भूमिकांच्या लूक टेस्टचे फोटो शेअर केले होते. या पोस्टमध्ये त्यानं दिलेल्या लूक टेस्ट आणि न मिळालेल्या भूमिकांविषयी सांगितले होती. ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. येत्या काळात कोणत्या ना कोणत्या चित्रपटांत माधवन महाराजांच्या भूमिकेत दिसतील. अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.

R Madhavan
Kantara: 'कांतारानं तर...' अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं कौतूक!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com