
'एक पिता म्हणून मी समाधानी'; आर्यनच्या जामिनावर आर. माधवन व्यक्त
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अखेर अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर अभिनेता आर. माधवनने R Madhavanट्विट करत समाधान व्यक्त केलं आहे. 'देवाचे आभार, एक पिता म्हणून मी खूप समाधानी आहे,' अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. (Aryan Khan Bail)
आर. माधवनचं ट्विट-
देवाचे आभार, एक पिता म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्व चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडू दे, असं ट्विट माधवनने केलं आहे.
हेही वाचा: आर्यन खानसह अरबाज, मुनमुनला जामीन मंजूर
उच्च न्यायालयाने तीन दिवस युक्तीवाद ऐकून घेतला. आर्यनची उद्या किंवा शनिवारपर्यंत कारागृहातून सुटका होईल, अशी माहिती आर्यनच्या वकिलांनी दिली. आर्यन खानचे वकील मुकुल रोहतगी आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अनिल सिंग यांच्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने अरबाज मर्चंटसाठी वकील अमित देसाई आणि मुनमुन धमेचाच्या बाजूने वकील काशिफ अली यांचीही बाजू ऐकून घेतली. एनसीबीने आर्यन, अरबाज आणि मुनमुनला ३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. आर्यनच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना शाहरुख खानला पाठिंबा दिला होता. तर काहींनी आर्यनसाठी सहानुभूती व्यक्त केली होती.
Web Title: R Madhavan Says Thank God As A Father I Am So Relieved After Aryan Khan Gets Bail In Drugs Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..