IMDb रेटिंगमध्ये आपटला सलमानचा 'राधे'

सर्वांत कमी रेटिंग मिळालेला सलमानचा दुसरा चित्रपट
radhe salman khan
radhe salman khan Tema esakal

सलमान खानच्या Salman Khan 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूपच कमी IMDb रेटिंग मिळाले आहेत. सध्या या चित्रपटाला १० पैकी २.१ इतकेच रेटिंग मिळाले आहे. ४३००० मतांवर आधारित हा रेटिंग असून सलमानच्या चित्रपटामुळे चाहते निराश झाले आहेत. IMDb वर सर्वांत कमी रेटिंग मिळालेला हा सलमानचा दुसरा चित्रपट आहे. याआधी 'रेस ३' Race 3 या चित्रपटाला १० पैकी १.९ रेटिंग मिळालं होतं. (Radhe IMDb rating falls to 2 point 1 is Salman Khans second lowest score )

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वाँटेड' या चित्रपटापासून सलमानला IMDb वर चांगली रेटिंग मिळत होती. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बजरंगी भाईजान'ला ८.० तर २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सुलतान'ला ७.० इतकी रेटिंग मिळाली होती.

radhe salman khan
माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारला 'राधे'मधील खलनायक; पाहा फोटो

गेल्या ११ वर्षांतील सलमानच्या चित्रपटांची IMDb रेटिंग-

दबंग (२०१०)- ६.२

वीर (२०१०)- ४.५

रेडी (२०११)- ४.७

बॉडीगार्ड (२०११)- ४.६

एक था टायगर (२०१२)- ५.५

दबंग २ (२०१२)- ४.८

जय हो (२०१४)- ५.१

किक (२०१४)- ५.३

बजरंगी भाईजान (२०१५)- ८.०

प्रेम रतन धन पायो (२०१५)- ४.४

सुलतान (२०१६)- ७.०

ट्युबलाइट (२०१७) - ३.९

टायगर जिंदा है (२०१७)- ५.९

रेस ३ (२०१८)- १.९

भारत (२०१९)- ४.९

दबंग ३ (२०१९)- ३.१

राधे (२०२१) - २.१

'राधे' या चित्रपटाला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ओटीटीवर ४२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. सलमानने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आणि चाहत्यांचे आभार मानले. हा चित्रपट ४० देशांमध्ये आणि भारतात झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com