Radhe
Radhe

Radhe Box Office Collection: सलमानच्या चित्रपटाने कमावले इतके कोटी रुपये

प्रेक्षकांना चित्रपट आवडला नसला तरी...

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा Salman Khan 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' Radhe Your Most Wanted Bhai हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला आहे. 'राधे' 13 मे रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि इतर ४० देशांमध्ये थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. सलमानच्या 'राधे'ने पहिल्या दिवशी 4.39 कोटींची कमाई केली आहे. (radhe overseas box office collection day 1 salman khan action thriller earns this much)

राधे चित्रपटाने ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, अमेरिका या देशांमधील प्रेक्षकांचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियामध्ये 35.77 लाखांची , न्यूझिलंडमध्ये 5.89 लाखांची तर अमेरिकेत या चित्रपटाने 40.41 लाखांची कमाई झाली आहे. युएईमध्ये या चित्रपटाने 2.77 कोटी रूपये कमवले आहेत. खरंतर या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तरी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'राधे'ने इतर देशांमध्ये चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाला ओटीटीवर आतापर्यंत ४२ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटामधून होणारी सर्व कमाई कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे.

Radhe
माजी सैन्य अधिकाऱ्याने साकारला 'राधे'मधील खलनायक; पाहा फोटो

सलमानने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्विट करत प्रेक्षकांचे आभार मानले. ट्विटमध्ये सलमानने लिहिले, 'सर्वांना ईदच्या शुभेच्छा. 'राधे' चित्रपटाला सर्वाधिक पाहिलेल्या चित्रपटाचे स्थान देऊन तुम्ही मला ईदचे अद्भुत रिटर्न गिफ्ट दिले आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. तुमच्या प्रेमाशिवाय फिल्म इंडस्ट्री जगू शकणार नाही, धन्यवाद.'

सलमानने हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये सलमानने 'राधे' चित्रपटाचे प्रमोशन करत चित्रपट पायरसीचा विषय नेटकऱ्यांसमोर मांडला. या व्हिडीओमध्ये सलमान म्हणाला, 'एक चित्रपट बनवण्यासाठी अनेक लोक कष्ट घेतात. मी सर्वांनी विनंती करतो की चित्रपटाचा आनंद घ्या पण तो योग्य प्लॅटफॉर्मवर पाहूनच घ्या.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com