esakal | सलमानचा 'नो किसिंग'ला बाय-बाय; 'या' अभिनेत्रीला केलं ऑन-स्क्रीन किस

बोलून बातमी शोधा

Radhe trailer salman khan ends no kiss policy with disha patani
सलमानचा 'नो किसिंग'ला बाय-बाय; 'या' अभिनेत्रीला केलं ऑन-स्क्रीन किस
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलिवूडचा सुपर स्टार सलमान खानच्या ‘राधे-युअर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपटाचा ट्रेलर आज नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील सलमानचा पावर पॅक अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. ड्रामा, लव स्टोरी, आणि थ्रिल हे सर्व सलमानच्या या नव्या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये समानसोबत रणदीप हूडा दिशा पाटणी आणि जॅकी श्रॉफ हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमध्ये रणदीप हूडा व्हिलनच्या व्यक्तिरेखेत खूप डॅशिंग आणि हटके लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या आधी रणदीप आणि सलमानची जोडी ‘किक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. राधे चित्रपटात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे एक आयटम साँग आहे.

ट्रेलरमधील सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे सलमानचा दिशासोबतचा किसींग सिन. या सिनमुळे आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. सलमान गेली कित्येक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहे. या क्षेत्रात काम करताना सलमानने कोणत्याही चित्रपटात किसींग सिन केलेला नाही. ‘मैने प्यार कीया’ या सलमानच्या चित्रपटात त्याने अभिनेत्री भाग्यश्री सोबत एक खोटा किसींग सीन केला होता. यामध्ये त्या दोघांमध्ये काचेचा दरवाजा होता. सलमानने अभिनय क्षेत्रात काम करताना स्वत;चा ‘नो किसिंग’ हा अलिखीत नियम पाळला होता. पण आता राधे चित्रपटासाठी सलमानने हा नियम मोडला आहे. राधेमध्ये सलमान आणि दिशाचा एक किसींग सीन आहे. ज्यामुळे सलमाच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.

राधे चित्रपट 13 मे रोजी ओटीटी प्लॅटफोर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. राधेची बॉक्स ऑफिसवर जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते 2’ सोबत टक्कर होणर आहे. त्यामुळे आता जॉन आणि सलमानची बॉक्स ऑफिसवरील ही स्पर्धा कोण जिंकेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.