esakal | Video : अ‍ॅक्शनचा तडका, दमदार संवाद; 'राधे'चा ट्रेलर पाहिलात का?

बोलून बातमी शोधा

Radhe movie

Video : अ‍ॅक्शनचा तडका, दमदार संवाद; 'राधे'चा ट्रेलर पाहिलात का?

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'राधे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रभूदेवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबतच जॅकी श्रॉफ, रणदीप हुडा, दिशा पटानी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद यांचा भरणा आहे.

मुंबईतील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जचं जाळं यांविरोधात लढण्यासाठी 'राधे'ची मदत मुंबई पोलीस घेतात. एन्काऊंटर स्पेशलिस्ट 'राधे'ची एण्ट्री दमदार दाखवण्यात आली आहे. 'एक बार मैने कमिटमेंट कर दी...', हा सलमानच्या तोंडी असलेला लोकप्रिय डायलॉग पुन्हा एकदा या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतो. त्याचप्रमाणे सलमान आणि दिशाच्या रोमान्सची झलकही त्यात पाहायला मिळते.

सलमानचा हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरसुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सध्याच्या घडीला देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता हा चित्रपट काही निवडक थिएटरमध्येच प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय झी 5, झी प्लेक्स यांसोबतच देशातील जे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत त्यावही प्रेक्षकांना सलमानचा 'राधे' पाहता येणार आहे.