राधिका आपटे म्हणतेय, 'त्या न्यूड व्हिडीओमुळे चार दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Radhika Apte

राधिका आपटे म्हणतेय, 'त्या न्यूड व्हिडीओमुळे चार दिवस घराबाहेर पडू शकले नव्हते'

बॉलिवूडमधल्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे राधिका आपटे Radhika Apte. आतापर्यंतच्या करिअरमध्ये राधिकाने अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. पण त्याचसोबत काही वादातही ती सापडली होती. राधिकाचा न्यूड व्हिडीओ जेव्हा लीक झाला होता, तेव्हा सोशल मीडियावर ती खूप ट्रोल झाली होती. या घटनेचा काय परिणाम झाला होता, याबद्दल ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त झाली. राधिकाच्या 'क्लीन शेवन' या चित्रपटातील तो क्लिप होता. (Radhika Apte on controversial video leak Could not step out for four days)

'ग्रेझिया' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राधिका म्हणाली, "क्लीन शेवन या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती न्यूड क्लिप व्हायरल झाली होती. त्यामुळे मला सर्वच स्तरांतून ट्रोल करण्यात आलं होतं आणि त्याचा परिणाम माझ्यावर झाला. चार दिवस मी माझ्या घराबाहेर जाऊ शकत नव्हते. मीडिया काय म्हणतेय याची मला भीती नव्हती पण माझे ड्राइव्हर, वॉचमन आणि माझ्या स्टायलिस्टचाही ड्राइव्हर मला त्या फोटोंमधून ओळखला होता."

हेही वाचा: 'हे आता मी खपवून घेणार नाही'; नेटकऱ्याच्या कमेंटवर भडकली सोनाली

"जे वादग्रस्त फोटो होते, ते नीट पाहिले असता कोणीही सांगू शकले असते की ती मी नाही. पण कदाचित त्याबाबत कोणीच काही करू शकत नव्हते, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे हाच पर्याय योग्य होता. काहीही करणं म्हणजे वेळ वाया घालवणं होतं. जेव्हा मी पार्च्ड या चित्रपटात बोल्ड सीन दिले, तेव्हा मला जाणवलं की लपवण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही."

राधिकाने लीना यादवच्या पार्च्ड या चित्रपटात एका देहविक्रेय महिलेची भूमिका साकारली होती. २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राधिकाने २००५ मध्ये 'वाह, लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली.

loading image
go to top