'माझा विवाहसंस्थेवर नाही विश्वास, व्हिसा मिळवण्यासाठी केले लग्न' 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 25 October 2020

मला वाटते विवाह करण्याच्या नियमांना कुठलेही बंधन नसावे. I am not a big marriage person असे राधिकाने म्हणते. मला त्या विवाहसंस्थेवर विश्वास नाही.

मुंबई - चाकोरीबध्द भूमिका सोडून वेगळी वाट निवडणा-या त्यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री म्हणून राधिका आपटेचे नाव घेतले जाते. ती जशी तिच्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिध्द आहे, तशी बोलण्यासाठीही. आपलं म्हणणं ठामपणे मांडून समाजातील चुकीच्या गोष्टींवर नेहमी भाष्य करणारी राधिका तिच्या एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

2012 मध्ये राधिकाने ब्रिटिश संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्न केलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने विवाहसंस्थेवर टीका करताना म्हटले की, मी काही फार मोठ्या प्रमाणात विवाहसंस्थेवर विश्वास ठेवत नाही. मला व्हिसा मिळायला कुठलीही अडचण होऊ नये यासाठी मी लग्न केले. ती सध्या लंडनमध्ये बेनेडिक्टबरोबर राहते. अभिनेता विक्रांत मेसी याने तिच्याशी संवाद साधला. सामान्यत; जे प्रश्नांची उत्तरे मुलाखतीतून देता येणं शक्य नसते अशा वेगळे प्रश्न विक्रांतने विचारले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Say hello to Netflix's new Massey-iah. #VikFlix @netflix_in @radhikaofficial

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey87) on

राधिकाने लग्न केव्हा केले ? असा प्रश्न तिला विचारला गेला त्यावेळी ती म्हणाली, जेव्हा तुम्ही लग्न कराल तेव्हा तुम्हाला व्हिसा मिळणे सोपे होईल. मला वाटते विवाह करण्याच्या नियमांना कुठलेही बंधन नसावे. I am not a big marriage person असे राधिकाने म्हणते. मला त्या विवाहसंस्थेवर विश्वास नाही. मी लग्न का केले याचे खरे कारण म्हणजे राहण्यासाठी व्हिसा मिळवणे. त्यावेळी मला व्हिसाची खुप मोठ्या प्रमाणात अडचण जाणवली. आम्हा दोघांनाही एकत्र राहायचे होते. आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. पण मला वाटते की हे कारण तितकेसे बरोबर नाही.

रात अकेली है हा गेल्या काही महिन्यांपूर्वी राधिकाचा  चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात ती नवाजुद्दिन सिध्दिकी याच्याबरोबर दिसली होती. क्राईम, सस्पेंन्स असणारा हा चित्रपट हनी तेहरान याने दिग्दर्शित केला होता. राधिका सध्या ही लंडनमध्ये राहते. लॉकडाऊनच्या काळाविषयी तिला विचारले असता ती म्हणाली, नेहमीसारखे माझे रुटीन होते. त्यात फार असा काही बदल नव्हता. या काळात मी आहाराकडे लक्ष दिले. व्यायाम केला. वाचन आणि लिखाणाचा प्रयत्न करुन पाहिला मात्र ते काही जमले नाही. सध्या परिस्थिती बदलते आहे असे आपण म्हणतो त्यावेळी अद्याप ब-याच गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. राधिकाने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
  
 
 
 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhika Apte says she does not believe in the institution of marriage