रिमा लागू यांच्या जागी रागिणी शाह

टीम ई सकाळ
शुक्रवार, 19 मे 2017

मुंबई - अभिनेत्री रीमा यांच्या आकस्मित निधनानंतर सध्या त्या करत असलेल्या नामकरण या मालिकेत त्यांची भूमिका कोण करणार हे प्रश्‍नचिन्ह होते. पण चॅनलने दुसऱ्याच दिवशी हा प्रश्‍न निकाली काढला असून रिमा यांच्या जागी आता गुजराती अभिनेत्री रागिणी शाह यांची निवड करण्यात आली आहे. 

चॅनलने अत्यंत जलदगतीने हा निर्णय घेतला असून केवळ एक लूक टेस्ट घेऊन शाह यांची निवड करण्यात आली. रागिणी यांनी वठवलेल्या 'दिया और बाती हम', 'सरस्वती चंद्र' या मालिकांमधील भूमिका कमालीच्या गाजल्या. रिमा यांचे निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून रागिणी यांच्या चित्रिकरणास सुरूवात झाली. 
 
Web Title: ragini shah replaced reema lagoo