मुलीच्या बुरख्यावर ए. आर. रेहमानचं स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

मुंबई : जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान सध्या वेगळ्या कारणानं सोशल मीडियावर चर्चेत आला. या चर्चेचं कारण त्याची मुलगी आहे. सोशल मीडियावर बुरखा घातलेले मुलीचे फोटो सध्या चर्चेचाविषय ठरला आहे. अर्थात या चर्चेनं वादाचं स्वरूप घेतलंय. आता या वादा खुद्द ए. आर. रेहमाननं खुलासा केलाय. यापूर्वी या सगळ्या प्रकरणावर ए. आर. रेहमान यांच्याकडून कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. दरम्यान, रेहमानची मुलगी खतीजा हिनंही यावर प्रतिक्रिया दिलीय. 

कोठून सुरू झाला वाद?
तस्लिमा नसरीन यांनी टि्वटरवरती लिहिलं होतं की, मला रहमानचे संगीत मनापासून आवडते. पण, त्याच्या मुलीचा फोटो पाहिला की माझा श्वास कोंडतो. तस्लिमा यांनी खातीजा रहमान हिचा फोटो ट्विट करत लिहीलं होतं की, हे अत्यंत निराशाजनक आहे की, सुसंस्कृत घरातील शिकलेल्या महिलांना ब्रेनवॉश करणं देखील किती सोप्प आहे. या ट्विटनंतर या विषयावर परत नव्याने चर्चा सुरू झाली. 

खतीजा काय म्हणाली?
यावर खतीजा हिने तेवढंच जोरदार उत्तर दिलं होतं. तिने सोशल मिडीयावर लिहीलं की, प्रिय तस्लीमा मला वाईट वाटतंय की, माझे कपडे पाहून तुमचा श्वास कोंडला जात आहे. तुम्ही मोकळी हवा घ्या. पण, मला श्वास कोंडल्यासारखं जराही काही वाटत नाही, त्याउलट मी ज्यावर विश्वास ठेवते. ती गोष्ट केल्याने मला स्वाभिमानी आणि सक्षम झाल्यासारखं वाटतं. यासोबतच खतीजाने तस्लिमा नसरीन यांना सल्ला देत सांगितलं की, तुम्ही फेमिनीझमची व्याख्या एकदा गुगल करून वाचा जेणेकरून तुम्ही एका स्त्रीला खाली खेचण्याचा किंवा विनाकारण तिच्या वडिलांना अशा प्रकरणात ओढणार नाहीत. तसंही मला तुम्हाला माझे फोटो पाठवल्याचं आठवत देखील नाही, असा टोमणाही खतीजानं लगावला.

मी माझ्या मुलांना चांगलं आणि वाईट यातील फरक करायला शिकवले आहे. त्यांना त्यांच्यासाठी योग्य काय आहे हे समजते. त्यामुळे स्वतः साठी काय योग्य आहे याचा निर्णय ते घेऊ शकतात. त्यासाठी ते स्वतंत्र आहेत.
- ए. आर. रेहमान, संगीतकार

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahman responds to daughter wearing a burqa