esakal | शाल विकणारा 'शिल्पाचा पती' कसा झाला 'अरबपती'?
sakal

बोलून बातमी शोधा

actress shilpa shetty husband raj kundra

शाल विकणारा 'शिल्पाचा पती' कसा झाला 'अरबपती'?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या (shilpa shetty) पतीची म्हणजे राज कुंद्रा (raj kundra) हा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. त्यानं पॉर्न व्हिडिओची निर्मिती केली आणि त्याचे वितरण सोशल मीडियावर केले. असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याला काल मुंबई पोलिसांनी अटकही केली. आता त्याला न्यायालयानं 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्तानं राज कुंद्रा हा चर्चेत आला आहे. त्याच्या नावाच्या मागे कायम बिझनेसमन अशीच पदवी चिकटली होती. मात्र त्याचा हा प्रवास कसा सुरु झाला याची माहिती घेऊया. (raj kundra sells pashmina shawl in starting days of business know about his business yst88)

सुरुवातीच्या काळात राजचा पश्मीना शाल विकण्याचा धंदा होता. असं सांगितलं तर तुम्ही कदाचित त्यावर विश्वास ठेवणार नाही. आता राजच्या मागे जे आरोप आहेत त्याचा परिणाम कुटूंबावर देखील झाले आहे. त्याची पत्नी शिल्पा शेट्टी ही सुपर डान्सच्या शुटिंगसाठी जाऊ शकलेली नाही. सध्या राज पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्यानंतर त्याला कोर्टात पुन्हा हजर केले जाणार आहे. 2009 मध्ये राजचा पहिल्या पत्नीपासून म्हणजे कवितापासून डिव्होर्स झाला होता. त्यानंतर त्यानं त्याच वर्षी शिल्पा शेट्टीशी लग्न केलं. शिल्पाच्या नावानं एक चॅरिटी ट्रस्टही सुरु केला आहे. मात्र शिल्पालाही राजच्या इतर बिझनेसची काहीही माहिती नव्हती.

लुधियानामध्ये राजचे वडिल राहत होते. नंतर ते लंडनमध्ये शिफ्ट झाले. राजचा जन्मही लंडनमध्येच झाला. त्याच शिक्षणही तिथेच झालं. त्याचे वडिल लंडनमध्ये बस कंडक्टरचे काम करायचे. आणि आई एका दुकानात काम करायची. कालांतरानं त्याच्या वडिलांनी एका छोट्या बिझनेसलाही सुरुवात केली होती. राज जेव्हा 18 वर्षांचा झाला तेव्हा तो दुबईला गेला. तिथून तो नेपाळला गेला. त्याठिकाणी त्यानं पश्मिना शाल ब्रिटनच्या एका मोठ्या दुकानात विकल्या. त्यातून त्याला बराच पैसा मिळाला होता.

हेही वाचा: हटके क्षेत्रात करिअर करणारे 'स्टार किड्स'

तेव्हापासून त्याची चलती सुरु झाली. आणि तो लोकप्रिय झाला. त्यानं हळुहळु बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. याशिवाय त्यानं दुबईमध्ये एक ट्रेडिंग कंपनीही स्थापन केली होती. यातून मिळालेल्या नफ्यामुळे त्यानं प्रॉडक्शन कंपनीही सुरु केली होती.

loading image