
Raj Kundra: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या अभिनयाने आणि वर्क आऊट मुळे खूप चर्चेत असते. पण गेल्या काही महिन्यांपासून तिचा पती राज कुंद्रा त्याच्या पोर्नोग्राफी केस बदल चर्चेत होता. सध्या तो त्याची जामीनावर सुटका झाली असली तरी ऐन दिवाळीत त्याच्या एका कृत्यामुळे तो ट्रोल झाला आहे.
(Raj Kundra Trolled Over His Unusual Mask At ramesh taurani Diwali Party)
अलीकडेच हे शिल्पा (shilpa shetty)आणि राज (raj kundra) दोघेही बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते. या पार्टीतही राज आपल्या जुन्या अवतारात दिसला. राज कुंद्राने एक विचित्र मुखवटा घातला होता, ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नव्हता. व्हिडिओमध्ये शिल्पा शेट्टी स्लीव्हलेस ब्लाउजसह साडी परिधान केलेली दिसली. ती तिच्या सुंदर लुकसह मस्त पोज देत होती, तर राज कुंद्राने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. पण राजचा संपूर्ण चेहरा विचित्र मास्कने झाकलेला होता. म्हणूनच तो नेकऱ्यांच्या चांगलाच लक्षात राहिला.
राजच्या अश्या अवताराने नेटकऱ्यांना कमेंट करण्याची चांगलीच संधी मिळाली. एका यूजरने लिहिले आहे की, "तुम्ही तुमचा चेहरा सतत का लपवून ठेवता, तुम्हाला आता लोकांचा सामना करायला भिती वाटते की काय" तर दुसऱ्याने लिहिले आहे की, "शिल्पाने तुमचा चेहरा दाखवण्या लायक सोडले नाही", ते एकजण म्हणतो, 'असं कृत्य केलं का की चेहरा लपवण्याची वेळ आली'. एका नेटकऱ्याने तर कहरच केला आहे. तो म्हणतो, 'त्याला मास्क लावावाच लागणार कारण तो सतत पॉर्न व्हिडओ पाहत असतो.' त्यामुळे राज त्याच्या मास्कमुळे पुन्हा ट्रोल झाला आहे.
राज कुंद्रावर पाॅर्न चित्रपट बनवणे आणि ती ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर विकण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे कुंद्रा चर्चेत आला होता. त्यानंतर राज कुंद्रा (Raj Kundra) काही काळ तुरुंगातही होता. सध्या त्याची जामीनावर सुटका करण्यात आली असून या आरोपातून आपली सुटका करण्यासाठी राज न्यायालयीन लढाई देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.