
पुरावे नष्ट केल्यामुळे राज कुंद्राला अटक- सरकारी वकील
अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी गुन्हे शाखेने अटक केली. कार्यालयाच्या झडतीदरम्यान राज आणि त्याचा सहकारी व्हॉट्सअॅपवरील चॅट्स आणि इतर पुरावे नष्ट करत होते. त्यामुळेच कुंद्राला अटक करण्यात आली, असा दावा सरकारी वकील अरुणा पै यांनी उच्च न्यायालयात केला. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही, असा आरोप कुंद्राच्या वकिलांनी केला होता. याविरोधात त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज कुंद्राचा सहकारी रायन थोर्पेला पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. (Raj Kundra was arrested as he had started deleting WhatsApp chats and was destroying evidence said Prosecutor slv92)
'हॉटशॉट्स' आणि 'बॉलिफेम' या दोन अॅप्समधून ५१ पॉर्नोग्राफि व्हिडीओ मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागल्याचीही माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. राज कुंद्राने हॉटशॉट अॅप संदर्भात प्रदीप बक्षीला पाठवलेला ईमेल आढळल्याचंही त्यांनी सांगितलं. लंडनमध्ये प्रदीप बक्षी यांच्या मालकीची कंपनी आहे. कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते आणि हॉटशॉट्स अॅप्सच्या माध्यमातून हा प्रकार चालविला जात होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा: राज कुंद्रामुळे शिल्पा शेट्टीला कोट्यवधींचं नुकसान
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह यश ठाकूर ऊर्फ अरविंद श्रीवास्तवच्या भूमिकेचाही तपास पोलीस करत आहेत. कुंद्राच्या कंपनीत तयार झालेले पॉर्न व्हिडीओ वितरित करण्यात श्रीवास्तवची प्रमुख भूमिका असल्याचा संशय पोलिसांना आहे.
Web Title: Raj Kundra Was Arrested As He Had Started Deleting Whatsapp Chats And Was Destroying Evidence Said Prosecutor
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..