Raj Thackeray: चित्रपट चांगला की वाईट यानं फरक पडत नाही, पण...राज ठाकरे स्पष्टच बोलले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Raj Thackeray

Raj Thackeray: चित्रपट चांगला की वाईट यानं फरक पडत नाही, पण...राज ठाकरे स्पष्टच बोलले

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीमध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा: Har Har Mahadev: जिथं तिथं 'हर हर महादेव'चीच चर्चा, ट्रेलर पाहून अंगावर काटाच..

राज म्हणाले, हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो 2003 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही. 2004 मी शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. त्या 9 फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाली बाळासाहेबांना त्या आवडल्या. मुंबई कोण बोललं आहे? भुरे यांनी म्हटलं राज यांनी दिला आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी उर्वरीत 9 शॉर्ट फिल्म्सला आवाज द्यायला सांगितले होते.

हेही वाचा: Har Har Mahadev: शरद केळकर साकारणार बाजीप्रभु! ‘हर हर महादेव’चे मोशन पोस्टर पाहाच

सगळ्यात बुलंद आवाज शरद केळकर यांचा आहे. माझ्या आवाजापेक्षा दुसरा कोणताही नाही. असं राज यांनी सांगितले. मला चित्रपट चांगला की वाईट यानं फरक पडत नाही. मला चित्रपट करताना कष्ट घेतले की नाही हे जास्त महत्वाचे वाटते. तुम्ही स्क्रिन प्ले वाईट आहे. एडिटिंग वाईट असेल तर काही उपयोग नाही. मी ज्यावेळी काशिनाथ घाणेकर पाहिला तो मला आवडला. तो ज्यानं बनवला त्यामुळे मी अभिजित यांची भेट घेतली.