..अन् रजनीकांत यांच्या डोळ्यात आलं पाणी | Rajinikanth | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rajnikant

..अन् रजनीकांत यांच्या डोळ्यात आलं पाणी

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'अन्नात्थे' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच रेकॉर्ड केला आहे. समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अन्नात्थे या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवा यांनी केलं असून त्यांनी रजनीकांत यांच्यासोबत पहिल्यांदाच काम केलं. या चित्रपटाविषयीचा एक महत्त्वपूर्ण प्रसंग त्यांनी एका व्हॉईस नोटद्वारे सांगितला. हा व्हॉईस नोट त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सोशल मीडियावरून अन्नात्थे साइन करण्यामागचं कारणसुद्धा स्पष्ट केलं.

काही वर्षांपूर्वी, रजनीकांत यांचा 'पेट्टा' चित्रपट हा शिवा यांच्या 'विश्वसम'सोबत प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेता अजित मुख्य भूमिकेत होता. विश्‍वासम पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी शिवासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. "पेट्टामध्ये मी स्टायलिश अवतारात आहे आणि पेट्टा चित्रपट हा विश्वसम या चित्रपटासोबत प्रदर्शित झाला. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. जेव्हा मी विश्वासम पाहण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो, तेव्हा विश्वासमच्या निर्मात्यांनी खास माझ्यासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था केली. मला मध्यांतरापर्यंतच चित्रपट आवडला पण तरीही हा एवढा हिट कसा झाला याचं मला आश्चर्य वाटत होतं. मात्र चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर मला त्याचं उत्तर मिळालं. मला तो चित्रपट खूप आवडला", असं रजनीकांत यांनी सांगितलं.

चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांत यांनी दिग्दर्शक शिवाची भेट घेतली. तेव्हा शिवा म्हणाला, "माझ्यासोबत हिट चित्रपट करणं अगदी सोपं आहे. त्यांच्या या वाक्यावर मी स्तब्धच झालो, कारण यापूर्वी मला असं कोणीही म्हटलं नव्हतं. ते पुढे म्हणाले की मी एखाद्या ग्रामीण कथेवर काम केलं पाहिजे.” त्यानंतर शिवाने अन्नात्थे चित्रपटाची स्क्रिप्ट रजनीकांत यांना ऐकवली आणि स्क्रिप्ट ऐकताच रजनीकांत यांनी तो चित्रपट साइन केला.

रजनीकांत यांनी शिवा यांना १५ दिवसांत ग्रामीण कथेवर आधारित चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन बोलावलं. "अवघ्या १२ दिवसांत ते स्क्रिप्ट घेऊन माझ्यासमोर हजर होते. माझा अडीच तासांचा वेळ आणि तीन पाण्याच्या बाटल्या पाहिजे असल्याचं त्यांनी मला सांगितलं. स्क्रिप्ट ऐकतानाच मला अश्रू अनावर झाले आणि उठून त्यांनी मिठी मारली", असं 'थलायवा' म्हणाले.

हेही वाचा: राजकुमार-पत्रलेखाच्या लग्नाचा अल्बम

अन्नात्थे चित्रपटात रजनीकांत हे एका गावप्रमुखाच्या भूमिकेत आहेत. ही कथा बहिण-भावाच्या नात्यावर भाष्य करणारी आहे. यामध्ये रजनीकांत यांच्यासह अभिनेत्री किर्ती सुरेश मुख्य भूमिका साकारत आहे.

loading image
go to top