
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत हे केवळ साउथमध्येच नव्हे तर पुर्ण भारतात लोकप्रिय आहेत. त्यांची लोकप्रियता भारताबाहेरही आहे. रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच आता त्यांचा जेलर हा चित्रपटही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटातील तमन्नाच्या गाण्याची खुपच चर्चा रंगली होती.
मात्र जसं बॉलिवूडमध्ये चित्रपट रिलिजपुर्वी काही ना काही नवा वाद रंगतो तसचं काहीसं आता टॉलिवूडमध्येही घडतांना दिसत आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट 10 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वीच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. एका मल्याळम चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी केली आहे.
मल्याळम चित्रपट 'जेलर'चे दिग्दर्शक सकीर मदाथिल यांनी रजनीकांतच्या 'जेलर'च्या निर्मात्यांना चित्रपटाचे टायटलमध्ये बदल करण्यास सांगितलं आहे. या मल्याळम 'जेलर' हा पिरियड थ्रिलर चित्रपट असून त्यात श्रीनिवासन दिसणार आहे.
एकाच टायटलचे दोन सिनेमे एकाच वेळी प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षक गोंधळात पडतील म्हणुन मल्याळम दिग्दर्शकाने नाव बदलण्याची विनंती केली. मदाथिल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आणि त्यात सांगितले की त्यांनी सन पिक्चर्सशी चर्चा केली आहे. परंतु त्यांना हे मान्य नाही ते केरळमध्येही चित्रपटाचे नाव बदलू इच्छित नाही.
रजनीकांत यांच्या 'जेलर' या तमिळ चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सने केली आहे. प्रोडक्शन हाऊसने या प्रकरणाबद्दल एक अधिकृत निवेदनही जारी केले आहे. ज्यात त्यांनी सांगतिले की, चित्रपट एका मोठ्या कलाकारांसह कॉर्पोरेट कंपनी हा चित्रपट तयार करत असल्याने आता अचानक हा बदल करणे शक्य नाही. त्यामुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतील.
रजनीकांत यांचा 'जेलर' नेल्सन दिलीप कुमार दिग्दर्शित असून यात मोहनलाल कॅमिओ करतिल तर बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफही दिसणार आहे. यात रजनीकांत, तमन्ना भाटिया, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट 10 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.