esakal | राजकुमार रावच्या ‘छलांग’ची चर्चा; ट्रेलर झाला व्हायरल   
sakal

बोलून बातमी शोधा

rajkumar rao trailer out

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.

राजकुमार रावच्या ‘छलांग’ची चर्चा; ट्रेलर झाला व्हायरल   

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

 मुंबई - काही वेळापूर्वी राजकुमार रावच्या छलांगचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.  हंसल मेहता दिग्दर्शित छलांग या चित्रपटात राजकुमारची  मुख्य भूमिका आहे. तर त्याच्या जोडीला अभिनेत्री नुशरत भरुचा दिसणार आहे.  ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर  या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १३ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. तर निर्मिती अजय देवगण, लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. स्त्री या चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर राजकुमारचा येणारा कसा असेल याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यातच त्याच्या छलांग या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता त्याच्या छलांग या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार मुख्य भूमिका साकारत असून पहिल्यांदाच तो नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ट्रेलरमध्ये मोंटू( राजकुमार राव) हा एका शाळेमध्ये पीटी शिक्षक असतो. तर त्याच शाळेमध्ये निलिमा( नुशरत भारुचा) कम्प्युंटर शिक्षिका म्हणून रुजू होते. निलिमाला पाहिल्यानंतर मोंटू तिच्या प्रेमात पडतो. त्यामुळे तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मोंटू प्रेमाची कबुली देण्यापूर्वीच सिंग सरांची शाळेत एण्ट्री होती आणि सगळं चित्र बदलून जातं. विशेष म्हणजे या चित्रपटात विनोदासोबतच एक प्रेरणादायी समाजिक संदेशही दिल्याचे दिसून आले आहे.