राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला केलं प्रपोज; पहा साखरपुड्याचा Video | Rajkummar Rao | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajkummar Rao

राजकुमारने गुडघ्यावर बसून पत्रलेखाला केलं प्रपोज; पहा साखरपुड्याचा Video

'स्त्री', 'रुही', 'बरेली की बर्फी', 'न्यूटन', 'सीटी लाइट्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारा अभिनेता राजकुमार राव Rajkummar Rao आज (१४ नोव्हेंबर) लग्नगाठ बांधणार आहे. गर्लफ्रेंड पत्रलेखाशी तो लग्न करणार असून चंदीगढमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. राजकुमार-पत्रलेखाच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो गुडघ्यावर बसून पत्रलेखाला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. 'द ओबेरॉय सुखविलास' या रिसॉर्टमध्ये हा साखरपुडा पार पडला. यावेळी राजकुमार आणि पत्रलेखा यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हुमा कुरेशी, साकिब सलीम, फराह खान हे सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राजकुमार आणि पत्रलेखाच्या साखरपुड्याचा हा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर अनेकांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रलेखाला अंगठी देण्यासाठी राजकुमार गुडघ्यावर बसल्यानंतर ती सुद्धा त्याच्यासाठी गुडघ्यावर बसते. यावेळी दोघांनी पांढऱ्या रंगसंगतीचे कपडे परिधान केले होते. राजकुमारने पत्रलेखासाठी आणखी एका सरप्राइज गिफ्टची तयारी केली आहे. मात्र ही भेटवस्तू तो लग्नाच्या दिवशी तिला देणार असल्याचं कळतंय.

हेही वाचा: उर्मिलाच्या बाळाचं बारसं; मुलाच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा

राजकुमार आणि पत्रलेखा गेल्या दहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. काही वर्षे हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 'सिटीलाइट्स' या चित्रपटात दोघांनी विवाहित दाम्पत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'बोस' या वेब सीरिजसाठीमध्येही दोघांनी एकत्र काम केलं. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान राजकुमारने पत्रलेखाला पाहिलं होतं आणि पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता.

loading image
go to top