Raju Srivastav Death News: कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तवचे निधन, हसरा चेहरा काळाच्या पडद्याआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj srivastava death

Raju Srivastav Death: कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तवचे निधन

Raju Srivastav Death Updates: अथक संघर्ष, कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर टीव्ही मनोरंजन विश्वात वेगळे स्थान निर्माण केलेल्या राजु श्रीवास्तवचे आज अखेर निधन झाले आहे. कॉमेडिचा बादशहा अशी त्याची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यानं प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले होते. त्याच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे. कित्येक मान्यवरांनी त्याला आदरांजली वाहिली आहे. काही दिवसांपूर्वी तो ट्रेड मिलवर धावत असताना त्याला अचानक हदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सममध्ये दाखल करण्यात आले होते. (Raju Srivastava passes away)

90 च्या दशकांतील टीव्ही मालिकांमध्ये छोट्या भूमिका करुन राजु श्रीवास्तवची मोठी झलक इंडियन लाफ्टर चँलेजमध्ये दिसली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला होता. पहिल्या लाफ्टर चँलेजचे विजेतेपद हे सुनील पालनं मिळवलं होतं. मात्र त्यात सगळ्यात लक्षवेधी ठरला तो राजु श्रीवास्तव. राजुनं त्या मालिकेतून अमाप लोकप्रियता मिळवली. घराघरात त्याचे नाव झाले. तो प्रेक्षकांच्या आवडीचा सेलिब्रेटी झाला होता. आता मात्र त्याच्या अचानक जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राजुनं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम केले. त्यानं मालिका. चित्रपट, जाहिराती यामध्ये काम केले. याशिवाय काही हिंदी विनोदी नाटकांमध्ये देखील त्यानं केलेल्या भूमिकांना प्रेक्षकांनी पसंत केले होते. (Raju Srivastava latest news

)

राजू जवळपास ४० दिवसांपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. ट्रेडमिलवर धावता धावता राजू खाली कोसळले. त्याला हदयविकाराचा झटका आल्याचे सुत्रांनी सांगितले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्यांचा वैद्यकीय इतिहास तपासल्यानंतर अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो क्लिनिकल उपचारांना प्रतिसाद देत असल्याचेही सांगण्यात आले होते.

राजुच्या जाण्यानं त्याच्या चाहत्यांना मोठा हादरा बसला आहे. सोशल मीडियावरुन त्याला त्याच्या लाखो चाहत्यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्यांनी त्याच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राजु केवळ कलाकार म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणूनही तो प्रेरणादायी होता. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहे. राजुला बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आदरांजली वाहिली आहे.

Web Title: Raju Srivastav Comedy King Passed Away Delhi Aims Hospital Due To Heart Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..