Raju Srivastava Health Update: राजु श्रीवास्तव अखेर शुद्धीवर|Raju Srivastava gained consciousness today after 15 day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Srivastava Health Update:

Raju Srivastava Health Update: राजू श्रीवास्तव अखेर शुद्धीवर

Raju Srivastava gained consciousness: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अखेर तो शुद्धीत आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून मृत्युशी राजुची झुंज सुरु होती. डॉक्टरांनी देखील चाहत्यांना आम्ही पूर्ण प्रयत्नाशी राजूला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे राजूच्या कुटूंबियांनी देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन चाहत्यांना केले होते. बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी देखील राजूच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्याचे दिसून आले. त्यात बिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल झाली होती.

पंधरा दिवसांनी राजुला शुद्ध आल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. राजूच्या आरोग्याविषयी माहिती देणारं ट्विट व्हायरल झाले आहे. 10 ऑगस्टपासून राजु हा दिल्लीच्या एम्स रुग्णालामध्ये दाखल होता. त्याच्या आरोग्यात आता सुधारणा होत असल्याचे त्याचा पर्सनल सेक्रेटरी गर्वित नारंगनं सांगितलं आहे. त्यामुळे राजुच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी राजूचा एमआरआय रिपोर्ट.. समोर आला होता.

राजू ट्रेड मिलवर धावत असताना त्याला हदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची शुद्ध हरपली होती. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी देखील एमआरआयचा दाखला देत राजू गंभीर अवस्थेत असल्याचे सांगितले होते. त्यावेळी चाहत्यांनी आणि कुटूंबियांनी काळजी व्यक्त केली होती. पंधरा दिवसांनंतर राजू शुद्धीत आल्यानं कुटूंबियांना दिलासा मिळाला आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध सेलिब्रेटी असणाऱ्या राजूनं कॉमेडी विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Web Title: Raju Srivastava Gained Consciousness Today After 15 Day Aiims Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..