राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट.. सुनील पाल यांनी..

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.
Raju Srivastava health update: Sunil Pal says comedian is out of danger after suffering heart attack
Raju Srivastava health update: Sunil Pal says comedian is out of danger after suffering heart attack sakal
Updated on

Raju Srivastav Health update: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते ज्यांनी आपल्या विनोदी स्वभावानं आणि अंदाजानं प्रेक्षकांना वेड लावले अशा राजु श्रीवास्तव यांच्या तब्येतीत आज बुधवारी सकाळी अचानक बिघाड झाला. राजु हे ट्रेडमिलवर धावत होते त्यावेळी अचानक त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी तातडीने दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यांनंतर बराच वेळ ते बेशुद्ध होते. आता त्यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. (Raju Srivastava health update: Sunil Pal says comedian is out of danger after suffering heart attack)

ही बातमी कळताच मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला. चाहते मोठ्या प्रमाणात हळहळ आणि चिंता व्यक्त करू लागले. यानंतर राजू यांनी एन्जिओग्राफी करण्यात आली मात्र एंन्जिओग्राफी नंतरही ते बेशुद्धच होते. हृदय विकाराचा झटका आल्याने त्यानं 48 तास रुग्णालयातच ठेवावे लागणार आहे. पण आता राजू श्रीवास्तव यांचा जवळचा मित्र आणि प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पाल यांनी मोठी माहिती दिली आहे.

चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे. कारण, सुनील पाल यांनी राजू श्रीवात्सव यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती दिली आहे. सुनील पाल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राजू यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. या व्हिडीओ सुनील म्हणाले आहेत, 'राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी खरी आहे. त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांची प्रकृती ठीक असून धोका टळला आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तो लवकर बरा होईल. राजू भाई लवकर परत या".

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com