
raju srivastava passes away: गेली काही दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणजे स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी काल 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेली 42 दिवस ते दिल्लीतील एम्स रुग्णालायत उपचार घेत होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना जीम मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार करूनही त्याला यश आले नाही. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्व शोकाकुल झाले असून प्रत्येकजन त्यांच्याविषयी लिहिते झाले आहेत. मराठी अभिनेते जयवंत वाडकर यांनीही एक महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. (raju srivastava passes away : actor jaywant wadkar emotional reaction on raju srivastava death) (raju srivastava funeral)
आपले दु:ख व्यक्त करताना वाडकर म्हणाले, 'एक अभिनेता म्हणून मी राजूच्या अभिनयाने नेहमीच प्रेरित झालो आहे. आम्ही एकत्र ही काम केले आहे, विल्सन लुईस दिग्दर्शित एक लघुपटात आम्ही एकत्र होतो. शिवाय एन. चंद्रा यांच्या 'तेजाब'मध्येही आम्ही एकत्र काम केले आहे. त्याच्या अभिनयाची छाप आजही रसिकांच्या मनावर कायम आहे. राजू आपल्याला सोडून गेला यावर अजूनही माझा विश्वास नाही. राजू श्रीवास्तव सर्व तरुणांसाठी एक प्रेरणा आहेत ज्यांना स्टँड-अप कॉमेडी करायची आहे त्यांनी राजूला प्रेरणास्थानी ठेवून काम करावे.'
राजू श्रीवास्तव यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन श्रृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज 22 सप्टेंबर रोजी राजू यांच्या पार्थिवावरवर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.