
Karan Arjun साठी सलमान खान नव्हता पहिली पसंती, सिनेमाचं नावही होतं भलतंच.. राकेश रोशन यांचा मोठा खुलासा
Karan Arjun: सिंगिंग रिअॅलिटी शो इंडियन आयडल १३ मध्ये लवकरच निर्माता-दिग्दर्शक राकेश रोशन गेस्ट म्हणून आलेले दिसणार आहेत. त्या शो मध्ये त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुमच्या अशा एखाद्या सिनेमाचं नाव सांगा ज्यासाठी तुम्ही एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याला ऑफर दिली होती पण काही कारणानं तो सिनेमा करु शकला नाही.
या प्रश्नाचं उत्तर देताना राकेश रोशन यांनी खुलासा केला की त्यांच्या 'करण अर्जुन' या सुपरहिट सिनेमाचं नाव आधी 'कायनात' होतं आणि या सिनेमात सलमान खान आधी नव्हता.
राकेश रोशन पुढे म्हणाले की,''कहो ना प्यार है सिनेमात आधी करिना कपूर होती पण काही कारणानं तिने तो सिनेमा केला नाही. तर करण अर्जुनमध्ये आधी सलमानची भूमिका अजयला ऑफर झाली होती. त्या सिनेमाचं नाव देखील कायनात होतं. ज्यात शाहरुख खान आणि अजय देवगण होते पण काही कारणानं अजयनं नंतर नकार कळवला''.(Rakesh Roshan reveal inside story of karan Arjun movie..salman khan was not his first choice_
माहितीसाठी थोडं सांगतो की 'करण अर्जुन' सिनेमा १९९५ साली प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन आणि निर्माती राकेश रोशन यांची होती. या सिनेमात सलमान खान,शाहरुख खान,राखी गुलजार, काजोल,ममता कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका होत्या.
अमरिश पुरी यात खलनायक होते. तर जॉनी लिव्हर,जॅख गौड,रंजीत आणि आसिफ शेख हे सारे सहकलाकार देखील सिनेमात होते.
हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
तर राकेश रोशन यांचा 'कहो ना प्यार है' सिनेमा २००० साली रिलीज होता . राकेश रोशन यांनी तो सिनेमा स्वतः लिहिला देखील होता आणि निर्मिती देखील त्यांचीच होती.
हृतिक रोशननं या सिनेमातून सिनेविश्वात अभिनेता म्हणून पदार्पण केलं होतं तर त्याच्यासोबत अमिषा पटेल सिनेमात दिसली होती आणि तिचा देखील तो पहिलाच सिनेमा होता. सिनेमानं बॉक्सऑफिसवर कमाईची बरसात करत लोकांवर जादू केली होती.